मराठी विरामचिन्हे व त्यांची नावे | मराठी विरामचिन्हे व त्याचे प्रकार | Viram chinh in Marathi

मराठी भाषेचा अभ्यास करताना व मराठी भाषेचे लेखन करताना त्यामधे विविध प्रकारचे विरामचिन्हे हे वापरले जातात. त्यामळे मराठी भाषेचा अभ्यास करताना मराठी विरामचिन्हे व त्याचे प्रकार हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. Viram chinh in Marathi म्हणजेच मराठी मध्ये ज्या विरामचिन्हाचा वापर होतो त्यालाच इंग्लिश मध्ये Punctuation Marks असे म्हणले जाते. 

   आज आपण ह्या लेखामध्ये विरामचिन्हे म्हणजे नेमके काय हे पाहणार आहोत. वाक्य संपल्यानंतर थांबणे व तेथे वापरले जाणारे खुणा याला विरामचिन्हे असे म्हणतात. भाषेमध्ये विरामचिन्हे यांना खुप महत्व आहे. वाक्य संपल्यावर आपण विराम घेतो, तो विराम किती वेळ घ्यायचा हे त्या विरामचिन्हा वरून समजत असते. लेखामध्ये विरामचिन्हाचा वापर नाही केला तर वाक्य कुठे संपेल आणि वाक्य कुठे पुर्ण झाले हे समजणार नाही. त्यामुळे कोणते विरामचिन्हे कुठे व कोणत्या वेळी वापरायचे हे आज आपण पाहणार आहोत. तर चला मग पाहूया.

मराठी विरामचिन्हे व त्याचे प्रकार | मराठी विरामचिन्हे व त्यांची नावे | Viram chinh in Marathi


विरामचिन्हांची नावे विरामचिन्हे
पुर्णविराम .
स्वल्पविराम ,
अर्धविराम ;
अपूर्णविरम :
प्रश्नार्थक चिन्ह ?
उदगारवाचक चिन्ह !
दंड |
लोप चिन्ह ...
अवतरण चिन्ह ( ' ' ) ( " " )
विकल्प चिन्ह /
अपसारण चिन्ह _
संयोग चिन्ह -
काकपद चिन्ह ^
   

विरामचिन्हाचे प्रकार किती आहेत ?

विरामचिन्हे खुप प्रकारचे आहेत पण लेखनामध्ये वारंवार ज्या विरामचिन्हाचा वापर होतो ते विरामचिन्हे पुढीप्रमाणे आहेत.
  1. पुर्णविराम ( . )
  2. स्वल्पविराम ( , )
  3. अर्धविराम ( ; )
  4. अपूर्णविरम ( : )
  5. प्रश्न चिन्ह ( ? )
  6. उदगारवाचक चिन्ह ( ! )
  7. दंड ( | )
  8. लोप चिन्ह ( ... )
  9. अवतरण चिन्ह ( ' ) ( " )
  10. अपसारण चिन्ह ( _ )
  11. संयोग चिन्ह ( - )

1. पुर्णविराम [ . ]

मराठी भाषामध्ये बोलताना किंव्हा लेखन करताना आपले वाक्य जेथे पुर्ण होते तेथे आपण थांबतो तेव्हा [.] अशी खूण वापरली जाते त्याला पुर्णविराम म्हणतात. तसेच ह्या खुणेद्वारे आपले वाक्य पुर्ण झाले हे समजते.
उदाहरण- 
  • माझे नाव आकाश आहे.
  • माझे आवडते फुल गुलाब आहे.
  • मी पुण्याचा आहे.
  • रामा हा सोमाचा भाऊ आहे.

2. स्वल्पविराम [ , ]

एखादे वाक्य लिहीत असताना आपल्याला मध्येच थोडेसे थांबायचे आसते तेव्हा [,] ह्या चिन्हांचा वापर करतात त्याला स्वल्पविराम म्हणतात. एकाच जातीचे एखादे वाक्य किंव्हा ऐका लागोपाठ छोटी वाक्य लिहीत असताना देखील स्वल्पविराम चा वापर करतात.
उदाहरण-
  • अमोलला केळी, सफरचंद, चिकू हे फळे खुप आवडतात.
  • आईने आज जेवणामध्ये बटाट्याची भाजी, कोबीची भाजी, गजरचा हलवा बनवला आहे.
  • बाबा, पुढे चला.

3. अर्धविराम [ ; ]

मराठी भाषेमध्ये एखादे वाक्य लेखन करत असताना एखाद्या ठिकाणी आपण अधिक वेळ थाबतो पण आपले वाक्य पूर्ण नाही होत तेव्हा [;] ह्या चिन्हांचा वापर होतो त्याला अर्धविराम म्हणतात.
उदाहरण-
  • झाडांना खुप आंबे आले आहेत; पण आंबे गोड नाहीत.
  • मला पुणेला जायचे आहे; पण माझ्याकडे पैसे नाहीत.

4. अपूर्णविरम [ : ]

भाषेमध्ये एखादे वाक्य लिहीत असताना वाक्याच्या शेवटी जर आपल्याला तपशील किंव्हा काही गोष्टींची यादी द्याची आसते तेव्हा हे [:] चिन्ह वापरतात त्याला अपूर्णविरम म्हणतात.
उदाहरण-
  • माझे आवडते फळे पुढीलप्रमाणे : केळी, सफरचंद, आंबे
  • सम संख्या पुढीप्रमाणे आहेत : 2, 4, 6

5. प्रश्न चिन्ह [ ? ]

मराठी भाषेमध्ये आपल्याला वाक्यांमध्ये प्रश्न विचारायचा असतो तेव्हा वाक्याच्या शेवटी [?] हे चिन्ह वापरतात त्याला प्रश्न चिन्ह किंव्हा प्रश्नार्थक चिन्ह म्हणतात.
उदाहरण-
  • तुझे बाबा कुठे गेले?
  • तुमचे नाव काय आहे?
  • तुमचे जेवण झाले का?

6. उदगारवाचक चिन्ह [ ! ]

भाषेमध्ये लेखन करत असताना वाक्यामध्ये मनातील दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना व्यक्त होत आसतात. अश्या भावना व्यक्त करत आसलेल्या शब्दाचा शेवटी [!] हे चिन्ह वापरात त्याला उदगारवाचक चिन्ह म्हणतात.
उदाहरण-
  • अरे देवा ! किती मोठे झाड हे !
  • अरे व्वा ! किती गोड आंबा आहे !

7. दंड [ | ] [ || ]

भाषेमध्ये अभंग, ओवी, श्लोक यांच्या वाक्याच्या शेवटी [|] हे चिन्ह वापरतात त्याला दंड असे म्हंटले जाते. दंडामध्ये दोन प्रकार आहेत ऐकरी
 दंड [|] आणि दुहेरी दंड [||].
उदाहरण-
  • ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
  • नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥

8. लोप चिन्ह [ ... ]

भाषेमध्ये एखादे वाक्य बोलताना किंव्हा लेखन करताना आपण मध्येच अखंड थांबतो तेव्हा जो खंड पडतो तेव्हा [...] हे चिन्ह वापरतात त्याला लोप चिन्ह म्हणतात.
उदाहरण-
  • आई मी खेळायला जाऊ...
  • दादा मला ते पाहिजे होते, पण...

9. अवतरण चिन्ह [ ' ] [ " ]

जेव्हा आपण वाक्यामध्ये एक शब्द किंव्हा एक शब्द समूह यावर जोर द्यायचा असतो तेव्हा [' '] [" "] हे चिन्ह वापरतात त्याला अवतरण चिन्ह म्हणतात.
  • अवतरण चिन्ह दोन प्रकारचे आसतात.
  • ऐकीरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह.

1) ऐकिरी अवतरण चिन्ह 
जेव्हा वाक्यामधील एखाद्या शब्दावर भर द्यायचा असतो तेव्हा ऐकिरी अवतरण चिन्ह ['] चा वापर करतात.
उदाहरण-
  • अहमदनगर हे ' ऐतिहासिक ' शहर आहे.

2) दुहेरी अवतरण चिन्ह 
जेव्हा वाक्यामधील एखाद्या शब्द समुहवर भर द्यायचा असतो तेव्हा दुहेरी अवतरण चिन्ह [" "] चा वापर करतात.
उदाहरण-
  • आई बोलली, "खेळायला जाऊ नको"

10. अपसारण चिन्ह [ _ ]

जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये एखाद्या गोष्टी बद्दल स्पष्टीकरण द्यायचे आसते तेव्हा आपण त्या ठिकाणी [_] हे चिन्ह वापरतो त्याला अपसारण चिन्ह म्हणतात.
उदाहरण-
  • बाळासाहेब पवार यांचे दोन मुले - आकाश आणि प्रकाश

11. संयोग चिन्ह [ - ]

जेव्हा आपल्याला दोन शब्दामधील किंव्हा वाक्यामधील सबंध दाखवायचा असतो तेव्हा [-] हे चिन्ह वापरतात त्याला संयोग चिन्ह म्हणतात.
उदाहरण-
  • भाऊ - बहीण
  • भाऊ - भाऊ



टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने