VJNT Loan Scheme वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत आसलेल्या थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा 25,000 रूपये वरुन 1,00,000 रुपये करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.
VJNT Loan Scheme राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना रोजगाराची संधी प्राप्त करुन देण्याच्या उद्देशाने शासन निर्णय दि. 30/11/2014 पासून 25,000 रुपये थेट कर्ज योजना राबविण्यात येतेय. पण सध्याच्या परिस्थितीत उद्योगांकरीता लागणारे भांडवल व गुंतवणूकीमध्ये झालेली वाढ, कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये झालेली वाढ व वाढत जाणारी महागाई ह्या बाबी विचारात घेता 25,000 रुपये इतकी कर्जाची मर्यादा कमी असल्याने वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणा-या थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा 25,000 रूपये वरुन 1,00,000 रुपये करण्यास महामंडळाच्या दि. 29/09/2021 रोजी वाढविण्यात आली आहे.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत आसलेली थेट कर्ज योजना पुढीप्रमाणे आहे.
VJNT Loan Scheme योजनेचे उद्देश
- भटक्या जमाती, विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्गातील घटक आर्थिक दृष्टीने सक्षम करणे.
- विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांना स्वयंरोजगारास प्रोत्साहित करणे.
- दुर्बळ व्यक्तींना व्यवसाय करण्याकरीता तात्काळ वित्त पुरवठा प्राप्त करून देणे.
- भटक्या जमाती, विमुक्त जाती आणि विशेष मागास प्रवर्गातील निराधार, विधवा महिला इ. लाभार्थीना तात्काळ स्वरूपात लाभ देणे.
VJNT Loan Scheme लाभार्थी निवडीची पात्रता
- योजनेचा अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- योजनेचा अर्जदार महाराष्ट्रामधील रहिवासी असावा.
- योजनेचा अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे.
- अर्जदाराचे आधार कार्ड जोडलेले बँक खात्याचा तपशिल.
- अर्जदारकडे महामंडळाच्या कोणत्याही योजनेची थकबाकीदार नसावी.
- एका वेळी कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल.
- शासकीय किंव्हा निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तरूण मुले किंव्हा मुली यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
VJNT Loan Scheme योजनेचे स्वरूप
वसंतराव नाईक भटक्या जमाती, विमुक्त जाती व विकास महामंडळातर्फे राबविण्याच्या प्रस्तावित थेट कर्ज योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
प्रकल्प | 1,00,000 रू पर्यंत |
महामंडळाचा सहभाग 100% | 1,00,000 रू |
व्याजदर | नियमितपणे कर्ज परतफेड करणा-या लाभार्थींना व्याज आकारण्यात येणार नाही |
कर्ज परतफेडीचा कालावधी व कर्जाची परतफेड नियमित करणा-या न लाभार्थ्यांच्याबाबतीत दंडनिय व्याजदर | 1)नियमित 48 समान मासिक हप्त्यामध्ये मुद्दल 2085 रू परतफेड करावी लागेल. 2) नियमित कर्जाची परतफेड न करणा-या लाभार्थीना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील, त्या रक्कमेवर द.सा.द.शे. 4% व्याज आकारण्यात येईल. |
पहिला हप्ता (75% ) | 75,000 रूपये |
दुसरा हप्ता (25%) (प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर साधारणपने 3 महिन्यानंतर) | 25,000 रुपये (जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार) |
टिप्पणी पोस्ट करा