अलीकडच्या काळात कोणालाही सहजा सहज नौकरी मिळत नाही.कोणाच्या हि ओळखिवर व गरज म्हणून नौकरी मिळत नाही. नोकरी आपल्या स्वतःच्या हिमतीवर मिळवावी लागते. खुप साऱ्या कंपन्यांमध्ये आगोदर परीक्षा ( Aptitude Test), ग्रुप डिस्कशन (Group Discussion) आणि त्यानंतर मुलाखत (Interview) असे स्टेप्स असतात. अनेक पात्र ( eligible candidates) आणि गरजु उमेदवार हे टप्पे पार करून फायनल मुलाखती (interview) पर्यंत पोहोचतात. यामध्ये त्यांना नोकरी मिळण्याची खुप शक्यता असते. आणि शेवटी अनेक उमेदवार पगाराबद्दल बोलताना (Salary Discussion in Interview) चूक करतात आणि हातची नोकरी गमावतात. तर मग या चुका आहेत तरी कोणत्या? आणि यामुळे तुमची हातची नोकरी कशी जाते? त्या संबंधी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यानंतर कोणी अशी चूक करणार नाही. चला तर मग पाहुया.
मुलाखतीच्या वेळी भावनिक होऊन बोलू नका -
मुलाखतीच्या वेळी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वारंवार तुमच्यासोबत ज्या काही घडलेल्या गोष्टी त्यांना सांगू नका. तुमची इमोशनल साईड त्यांना दाखवल्यामुळे तुम्ही कमकुवत आहात असं त्यांना वाटू शकते. त्यामुळे इमोशनल नाही बोलायाचे, बोलताना पॉझिटिव्ह बोला. तुमच्यातील चांगले चांगले गुण त्यांना सांगा.
तुम्ही मला पगार किती देणार? हे चुकुन पण विचारू नका.
मुलाखती दरम्यान (Interview) पगार हे तुमचे मुख्य आकर्षण आहे असं दाखवू नका. म्हणूनच Interview दरम्यान पगार किती भेटणार? किंवा पगार किती देणार? असे प्रश्न मुळीच विचारू नका. यामुळे तुमचं इम्प्रेशन खुप खराब होऊ शकते. त्यामुळे मुलाखतीच्या वेळी (Interview) जेव्हा पगाराबद्दल विचारण्यात येईल तेव्हाच त्याबद्दल बोला आणि निगोशिएट (Salary Negotiation) करा.
तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू नका -
मुलाखतीच्या वेळी पगाराबद्दल बोलताना मुळीच आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल (Personal Life) किंवा आर्थिक समस्यां बद्दल बोलू नका. याच्यावरून असे समजते की तुम्हाला फक्त पगारातच रस आहे असं कंपनीला वाटू शकतं. त्यामुळे वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्यापेक्षा प्रोफेशनल पद्धतीनं निगोशिएट करा.
तुमच्या अनुभवापेक्षा जास्त पगार मागू नका -
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला जितका अनुभव आहे तेवढ्याच पगाराची मागणी करा. जर अनुभव कमी आहे तर जास्त पगाराची मागणी करू नका. जर तुम्हाला जास्त अनुभव असाल आणि पगार कमी भेटत असेल तर याबद्दल मुलखात ( Interview ) घेणाऱ्या व्यक्तीला सांगा. तसंच तुमच्या पोस्टच्या मार्केट व्हॅल्यूबद्दलही (Market Value) त्यांना सांगा.
टिप्पणी पोस्ट करा