खुप विद्यार्थ्यांना रात्री जागून अभ्यास करायची सवय असते. पण अनेकदा या रात्री केलेल्या अभ्यासामुळे फायदा (Benefits of Night Study) होतो तर अनेकदा रात्री केलेल्या अभ्यासामुळे तोटेही (cons of night study) होऊ शकतात. तर आज आम्ही तुम्हाला रात्री जागून अभ्यास करण्याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे (Pros And Cons Of Late Night Study) आहेत हे सांगणार आहोत. तर चला मग पाहूया.
सकाळी लवकर उठण्या माघे अनेक फायदे आहेत यात कुठलीच शंका नाही. खरे म्हणजे तर त्या वेळी मन एकदम फ्रेश असते. प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतःची अभ्यास करण्याची क्षमता असते आणि त्यानुसार तो आपल्या अभ्यासाचं वेळापत्रक बनवतो. पण अनेकदा रात्रीच्या वेळी अभ्यास केल्यामुळे प्रकृतीच्या समस्या जाणवू शकतात.
रात्रभर अभ्यास करण्याचे तोटे -
रात्रभर अभ्यास करण्यात काही नुकसान नाही असा अजिबात नाही.
खुप संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की विद्यार्थी रात्री वाचलेल्या गोष्टी सकाळी विसरतात.
रात्रभर अभ्यास केल्याने पुरेशी झोप नाही मिळत. त्यामुळे मेंदूच्या तीक्ष्णतेवर परिणाम होतो.
रात्रभर अभ्यास करून तुम्हीची झोप नाही झाली तर दुसऱ्या दिवशी, जर तुम्ही शाळा किंवा महाविद्यालयात गेलात किंवा ऑनलाइन क्लासेसमध्ये जात असाल तर तुम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाही.
रात्रभर अभ्यास करण्याचे फायदे -
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण जे रात्रभर जागे राहतात त्यांनाही अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही फक्त रात्रीच अभ्यास करत आसाल तर हे फायदे जाणून घेतल्यास तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.
रात्रभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे सतर्क राहण्याची आणि एकाग्रतेची क्षमता चांगली असते.
कोठलीही माहिती ते जास्त काळ लक्षात ठेवू शकतात.
रात्रीच्या वेळी कोर्टिसोलची पातळी जास्त असल्याने परीक्षेत येणार ताण टळतो.
टिप्पणी पोस्ट करा