मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना हि गोर गरीब शेतकरी बांधव यांच्या सोयी साठी राज्य सरकार ने चालू केलेली योजना आहे.हि योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सिंचन पद्धतीने शेती करता यावी यासाठी ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ( Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana ) चालू केलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना सिंचन सुविधे साठी सहाय्य करणे हे उद्देश आहे.
या योजने मध्ये आपण वापरत असलेल्या जुने डिझेल व विजेवर चालणारे पंप काढून त्याचा जागेवर सोलर पंप बसवणार आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ( Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana ) मध्ये ते शेतकरी बांधवांना सबसिडी पण देणार आहेत.
आणि ज्या शेतकरींची 5 एकर पेक्षा जास्त शेती असेल त्या शेतकऱ्यांना ही योजना 5 hp तसेच 5 एकर पेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना 3 hp चे पंप देखील देणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ( Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana ) सुरू करण्याचा मुख्य उद्देश काय आहे ?
आपण सर्वानाच माहिती आहे भारत हा कृषि प्रधान देश आहे. आपल्या सर्वानाच मुख्य स्त्रोत हा शेतीच आहे. त्यातूनच आपल्याला मिळकत होते.
आपण आपल्या पिकांसाठी पावसाची खुप आतुरतेने वाट पाहत आसतो तसेच आपण सर्व विजेची पण वाट पाहत असतो. आपल्या कडे विजेचा पण खुप अडचण असते. म्हणून महाराष्ट्र सरकारने हि अडचण लक्ष्यात घेता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली. जेणेकरून काही ठिकाणी आजुन काही शेतकऱ्यांना विजेची अडचण आहे त्यांना या योजनेनी खुप आधार भेटेल. हाच मुख्य हेतू आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र
1) दोन पासपोर्ट साईज फोटो
2) रहिवासी प्रमाणपत्र
3) आधार कार्डची प्रत
4) ओळखीचे प्रमाण
5) बँक अकाऊंट पासबुक
6) मोबाइल नंबर
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा भरायचा ?
1) आगोदर आपण आपला Laptop किव्हा Computer उघडावा.
2) त्यामधे Google उघडुन त्यात सर्च बार मध्ये mahadiscom.in/solar हे टाकावे.
3) मग ती साईट open होईल त्यात तुम्हाला दोन पर्याय दिसतील. स्कीन इन्फो आणि बेनिफिशरी सर्विसेस.
4) बेनिफिशरी सर्विसेस वरती क्लिक करा.
5) ते open केल्यावर तुम्हाला Apply Online असे दिसेल त्यावर क्लिक करा.
6) Apply Online केल्या वर तुम्हाला आजुन काही पर्याय दिसतील.त्यातील solar agriculture pump 7.5 यावर क्लिक करा.
7) तेथे क्लिक केल्यावर एक Application Form येईल, तो फॉर्म तुम्ही मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषा मध्ये भरू शकता.
8) Application Form मध्ये विचारली जाणारी सगळी माहिती अचूक पणे भरा.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप बसविण्याने होणारे फायदे
सौर कृषी पंप बसविल्यानतर आपल्याला अखंड विज पुरवठा मिळेल.
कुठलीही प्रकारचे विज बिल नाही भरावे लागणार.
अधिक माहितीसाठी https://www.mahadiscom.in/solar/ ह्या संकेत स्थळावर भेट द्या.
टिप्पणी पोस्ट करा