पतीच्या निधनानंतर महिलांसाठी जगामध्ये वावरणे व जगणे अधिक अवघड होत आसते. त्यांना मानसिक व आर्थिक मदतीची अत्यंत गरज असते. त्यांच्या पतीच्या निधनानंतर मुलांच्या पालनपोषण, मुलांचे शिक्षणाचा खर्च, संसार साठी लागणारा खर्च याची जबाबदारी वाढते. यामुळे या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन योजना सुरू केली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकार ने होतकरू व गरीब विधवा महिलांसाठी महाराष्ट्र विधवा पेंशन योजना ही योजना सुरू केली आहे. येणाऱ्या काळात खूप गरीब विधवा महिलांसाठी हि योजना फायद्याची ठरली जाईल. 2022 मध्ये ह्या योजनेचा विधवा महिलांना याचा लाभ घेता येईल. या योजने अंतर्गत होतकरू व गरीब विधवा महिलंसाठी महाराष्ट्र राज्य सरकार 600 रुपये प्रति महिना देणार आहे. ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आसेल तर खालील माहिती जाणून घ्या.
महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याद्वारे सुरु केलेली इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. यामागील खरे कारण आहे विधवा महिलांना प्रतिमाह निवृत्ती वेतनाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करणे. या योजने अंतर्गत लाभार्थी महिलेस प्रतिमाह 600 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येईल.याचा लाभ सर्व प्रवर्ग तील महिला घेऊ शकतात.
महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेसाठी लागणारी पात्रता -
1) महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी ती महिला महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी मागील १५ वर्ष रहिवासी पाहिजे.
2) पात्र असलेल्या महिलेचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
3) पात्र असलेल्या विधवा महिलेचे वार्षिक उत्पन्न कमित कमी २१,००० रुपये किंवा त्याही पेक्षा कमी असावे.
4)विधवा महिलेचे वय ४० ते ६५ वर्षे या दरम्यान पाहिजे.
5)पात्र असलेली विधवा महिला दारिद्र्यरेषेखालील (Below Poverty Line) धारक असावी.
6) आणि ती महिला इतर कुठल्या योजनेची लाभार्थी नसावी.
7) विधवा महिलेने जर दुसरे लग्न केले तर तिची हि योजना बंद होईल.
योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे -
1)आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
2)शाळा सोडलेला दाखला
3)वार्षिक उत्पन्नाचा दाखला
4)जातीचा दाखला
5)काही पासपोर्ट साइज फोटो
6)पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
7)महिलेचा रहिवासी दाखला
8)बँक खाते पासबुक
महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पुढील पायाऱ्याचा वापर करा -
1) आपल्या laptop किंवा कॉम्पुटर वर
https://mumbaisuburban.gov.in/sanjay-gandhi-yojana/ ह्या संकेत स्थळावर जा.
2) तुमच्या स्क्रीन वर होम पेज उघडेल.
3) त्यामधे तुम्हाला मेनू दिसेल त्यावरती क्लिक करून ‘Forms’ हा पर्याय निवडा.
4) त्यामधील उपलब्ध असलेले नोंदणी अर्ज उघडा.
5) तो अर्ज डाऊनलोड करा किंवा येथे असलेले डाउनलोड वर क्लिक करुन डाऊनलोड करा.
6) त्या अर्जामध्ये सांगितलेली माहिती भरा.
7) त्या सोबत लागणारे सर्व कागदपत्रे जोडा.
8) तो कागदपत्रे जोडलेला अर्ज तुमच्या जवळच्या संजय गांधी योजना किंवा तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयात जमा करा.
अधिक माहितीसाठी https://sjsa.maharashtra.gov.in/
ह्या संकेस्थळावर भेट द्या.
टिप्पणी पोस्ट करा