मराठी राजभाषा दिन 2022 | मराठी भाषा दिवस निबंध, घोषणा वाक्य | Marathi Rajbhasha Din 2022

राठी राजभाषा दिन हा दिवस दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खुप मोलाचे योगदान आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी खुप परिश्रम घेतलेले आहेत. कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात यावा म्हणून शासनाने दिनांक 21 जानेवारी 2013 रोजी निर्णय घेण्यात आला.

मराठी राजभाषा दिन निबंध -
  आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, वंदणीय गुरुजनवर्ग, आदरणीय व्यासपीठ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या आणि विविध संतांच्या शिकवाणीने प्रेरित झालेल्या, कुसुगाराज व विविध साहित्यिकांच्या साहित्याने समृध्दी लाभलेल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या माझ्या मराठी मावळ्यांनो. 
  ज्ञानपीठ पुरस्कार विजेते व मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिनानिमित्त मराठी भाषा दिन हा सगळीकडे साजरा केला जातो. क्रांतीचा जयजयकार, वेडात मराठे वीर दौडले सात आणि जमीन पृथ्वीचे प्रेमगीत अश्याप्रकारच्या कुसुमाग्रज यांच्या कविता आजही लोकप्रिय आहेत. 27 फेब्रुवारी हा दिवशी फक्त महाराष्ट्रात किंव्हा भारतातच नाही तर हा दिवस सर्व जगभरात साजरा केला जातो.
  27 फेब्रुवारी हा दिवस साजरा करताना गायन, वादन, वक्तृत्व स्पर्धा, मराठी निबंध स्पर्धा, शास्त्रीय संगीत यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मराठी साहित्या मधील नाटकांचे आयोजन करून मराठी भाषेला एक दिशा दिली जाते. आपण सर्वजनाणी मिळून मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे. आजच्या नवीन पिढीला आपल्या महाराष्ट्रचा इतिहास, मराठी भाषेचा इतिहास, आपले साहित्य वाचायला उत्तेजना दिली पाहिजे. अश्याप्रकारेच मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला खरा अर्थ प्राप्त होईल. माझ्या मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या सर्व मराठी मावळ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
||  जय हिंद  ||
||  जय महाराष्ट्र  ||


मराठी राजभाषा दिन घोषणा वाक्य

माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा.
हिच्या संगाने जागल्या,
दऱ्याखोऱ्यांतील शिळा.


माय मराठी,
साद मराठी,
भाषांचा भावार्थ मराठी,
बात मराठी,
साथ मराठी ,
जगण्याला या अर्थ मराठी.


स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाउल पडते पुढे.


परदेशात वाजती मराठीचे चौघडे,
मराठीचे विश्व वसे जगती चोहीकडे.
मराठीचा बोलबाला आसमंतात दुमदुमु ढ्या, मायबोली मराठीत मराठी मनामनात रमू दया.


देव, देश अन् धर्म मराठी,
श्वासा श्वासांत इथल्या नांदते मराठी.


घासल्या शिवाय धार नाही  तलवारीच्या पातीला,
मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने