Yes Bank चे डेबिट कार्डचा वापर ऑनलाइन नियंत्रित करायचे आसेल तर तुम्ही ते Yes Bank चे ग्राहक नेट बँकिंग (Net Banking) आणि मोबाईल बँकिंगद्वारे नियंत्रित करू शकतात. जर तुम्हाला तुमचे येस बँक चे डेबिट कार्ड तात्पुरते ब्लॉक किंव्हा अनब्लॉक करायचे आहे तर ही सुविधा मोबाइल बँकिंग (मोबाइल Banking) आणि नेट बँकिंगवरही उपलब्ध आहे.
जर तुमचे डेबिट कार्ड हरवले आसेल तर तुम्ही ते तात्पुरते ब्लॉक करा, म्हणजे तुम्हाला ते डेबिट कार्ड परत सापडले तर ते कार्ड तुम्ही अनब्लॉक करू शकता आणि सर्व डेबिट कार्ड व्यवहार पुन्हा सुरू करू शकता. आम्ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ते डेबिट कार्ड कसे ब्लॉक करायचे हे सांगणार आहोत. ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड ब्लॉक करण्याचे दोन पर्याय आहेत ते खालीप्रमाणे आहेत.
नेट बँकिंगद्वारे Yes Bank चे डेबिट कार्ड कसे ब्लॉक करायचे? (How to Block Yes Bank Debit Card with Net Banking) -
1) सर्वप्रथम Yes Bank च्या Yes Net Banking मध्ये लॉग इन करा.
2) लॉग इन केल्यानंतर मेनू पर्यायांवर क्लिक करा.
3) मेनू उघडल्यावर त्यामधे "Debit Card" हा पर्याय निवडा.
4) त्यानंतर Debit Card Dashboard वर क्लीक करा.
5) त्यानंतर तुम्हाला "Block/Hotlist Card" हे ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
6) त्यावर क्लिक केल्यावर तेथे "Temporary Block" ऑप्शन निवडा.
7) आणि आता "Next" वरती क्लीक करा. आणि submit करा.
आता तुमचे डेबिट कार्ड हे तात्पुरते ब्लॉक झालेले आहे. आणि तुम्हाला जर ते अनब्लॉक करायचे आसेल तर तुम्ही नेट बँकिंगमध्ये लॉग इन करून अनब्लॉक पर्याय निवडून ते कधीही अनब्लॉक करू शकता.
मोबाईल बँकिंगद्वारे Yes Bank चे डेबिट कार्ड कसे ब्लॉक करायचे? (How to Block Yes Bank Debit Card with Mobile Banking) -
1) सर्वप्रथम Yes Bank चे Mobile Banking ह्या ॲप मध्ये लॉग इन करा.
2) लॉग इन केल्यानंतर मेन्यू ओपन करा.
3) मेन्यू मध्ये तुम्हाला Cards ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
4) त्याच्यानंतर तुम्हाला तिकडे Debit Cards ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
5) त्यापुढे तुम्हाला Block/Unblock Card असे ऑप्शन दिसेल ते निवडा.
6) पुढील स्क्रीनवर तुम्ही तुमचा डेबिट कार्डचा नंबर निवडा आणि Block ऑप्शन वर क्लिक करा.
आता तुमचे डेबिट कार्ड हे ब्लॉक झालेले आहे.
टिप्पणी पोस्ट करा