लेजेंड्स लीग क्रिकेट मॅच कुठे दिसेल | How to watch Legends League Cricket matches online Marathi

   
     क्रिकेट विश्वातील काही मोठी नावे 22-यार्डच्या खेळ पट्टीवर पुन्हा एकत्र दिसतील. 20 जानेवारी रोजी लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (Legends League Cricket 2022) जगभरातील निवृत्ती घेतलेले दिग्गज खेळाडू क्रिकेट खेण्यासाठी तयार आहे. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, हरभजन सिंह, इरफान पठाण हे दिग्गज खेळाडू भारतीय महाराज ( Indian Maharajas) संघाकडून खेळताना दिसतील. भारताचा माजी दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग लेजेंड्स लीग क्रिकेट (LLC 2022) टी-20 स्पर्धेमध्ये भारतीय महाराज (India Maharaja) या भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करेल. शोएब अख्तर,सनथ जयसूर्या, शाहिद आफ्रिदी, चामिंडा वास हे दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये आशिया लायन्स या संघाकडून खेळणार आहेत. आणखी ज्यात डॅरेन सॅमी, डॅनियल व्हिटोरी, ब्रेट ली, जॉन्टी रोड्स, केविन पीटरसन इत्यादी खेळाडू देखील आपला जलवा दाखवतील. या लीगच्या संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

लीजेंड्स लीग (Legends League Cricket 2022) हि स्पर्धा 10 दिवस चालेल. हि स्पर्धा ओमानमधील मस्कत येथील ओमान क्रिकेट अकादमी मैदानावर होत आहे.


लेजेंड्स लीग क्रिकेट 2022 वेळापत्रक (Legends League Cricket 2022 Time Table Marathi) -
सर्व सामन्याचा वेळ हा भारतीय वेळेनुसार 8pm आसेल.

  1. 20 जानेवारी -> भारत महाराज विरुद्ध आशिया लायन्स
  2. 21 जानेवारी -> वर्ल्ड जायंट्स विरुद्ध आशिया लायन्स
  3. 22 जानेवारी -> वर्ल्ड जायंट्स विरुद्ध भारत महाराज
  4. 24 जानेवारी -> आशिया लायन्स विरुद्ध भारत महाराज
  5. २६ जानेवारी -> भारत महाराज विरुद्ध वर्ल्ड जायंट्स
  6. 27 जानेवारी -> आशिया लायन्स विरुद्ध वर्ल्ड जायंट्स
  7. 29 जानेवारी -> फायनल


लेजेंड्स लीग क्रिकेट 2022 संघ (Legends League Cricket 2022 Team's Marathi) -

इंडियन महाराज (Indian Maharajas) -> वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, हरभजन सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, बद्रीनाथ, आरपी सिंह, प्रज्ञान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगर, नयन मोंगिया, आणि अमित भंडारी.

आशिया लायन्स ( Asia Lions ) -> शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, कामरान अकमल, चामिंडा वास, रोमेश कालुविथरना, तिलकरत्ने दिलशान, अझहर महमूद, उपुल थरंगा, मिसबाह-उल-हक, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, मोहम्मद मलिक, मोहम्मद युसूफ, उमर गुल, असगर अफगाण.

वर्ल्ड जायंट्स ( World Giants ) -> डॅरेन सॅमी, डॅनियल व्हिटोरी, ब्रेट ली, जॉन्टी रोड्स, केविन पीटरसन, इमरान ताहिर, ओवेस शाह, हर्शल गिब्स, अल्बी मॉर्केल, मॉर्नी मॉर्केल, कोरी अँडरसन, मॉन्टी पानेसर, ब्रॅड हॅडिन, केविन ओब्रायन आणि ब्रेंडन टेलर.


लेजेंड्स लीग क्रिकेट 2022 टीव्ही वर कुठे दिसेल (How to watch Legends League Cricket matches watch Online) ->
Sony Ten 1 आणि Sony Ten 3 चॅनेलवर लेजेंड्स लीग क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण होईल.


लेजेंड्स लीग क्रिकेट 2022 ऑनलाईन कुठे दिसेल (How to watch Legends League Cricket matches on TV) ->
लेजेंड्स लीग चे क्रिकेट सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग हे Sony Liv वर पहायाला भेटल.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने