म्युच्युअल फंड (Mutual Fund) बद्दल विविध तुम्ही विविध प्रकारच्या बातम्या, वर्तमानपत्रातील काही जाहिराती, टीव्ही वर येणाऱ्या जाहिराती मध्ये ऐकत असाल. परंतु याबद्दल आपल्याकडे संपूर्ण माहिती नसते. तर आज आपण म्युच्युअल फंड (Mutual Fund) बद्दल संपूर्ण माहिती घेऊया. म्युच्युअल फंड बद्दल संपूर्ण माहिती पहायची आसेल तर तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत वाचवा लागेल. तर चला मग पाहूया.
म्युच्युअल फंड म्हणजे काय? (What is Mutual Fund in Marathi) -
तुम्ही खुप ठिकाणी म्युच्युअल फंड बद्दल जाहिराती पाहत असाल. पण तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे तुमच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत असतील. ते प्रश्न म्हणजेच यामध्ये गुंतवणूक कशी करतात, गुंतवणूक केल्यावर ती सुरक्षित राहील का नाही.
म्युच्युअल फंड हा भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा एक प्रकार आहे. म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक करू शकता. त्यामध्ये मनी मार्केट, शेअर मार्केट, बॉण्ड असे पर्याय आहेत. म्युच्युअल फंड आपल्या भाषेत म्हणजे एखादी कंपनी आहे त्या कंपनीला तिचा व्यापार वाढवण्यासाठी पैशांची गरज आसते, मग त्या कंपनीला आपल्यासारख्या ज्या लोकांनी म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवलेले आहेत, त्या पैशाचा वापर कंपनी व्यापार वाढविण्यास करते. आणि शेवटी कंपनीला जर फायदा झाला तर गुंतवणुक दाराला देखील त्याचा फायदा होतो. याचा उद्देश असा आहे कि कंपनी आणि गुंतवणूकदार या दोघांना याचा फायदा होतो. पण कंपनीला तोटा झाला तर गुंतवणूकदाराला सुद्धा तोटा होत असतो. आणि तुम्हाला तोटा नसेल होऊ द्याचा तर तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगली कंपनी निवडली पाहिजे. तसेच आपण गुंतवणूक कुठे करावी आणि किती करावी त्यापासून आपल्याला किती फायदा होईल हे सांगण्यासाठी प्रत्येक म्युच्युअल फंड मध्ये काही एजंट लोक असतात. त्यांच्या सल्ल्या घेऊन देखील आपण गुंतवणूक करू शकतो.
म्युच्युअल फंड चा इतिहास (History of Mutual Fund) -
म्युच्युअल फंड चा इतिहास हा खूप जुना आहे. 1963 साली भारतातील पहिला म्युच्युअल फंड सुरु करण्यात आला होता. तो म्युच्युअल फंड भारत सरकार आणि भारतीय रिजर्व बँक यांनी सुरु केला होता. त्यांनतर बऱ्याच सार्वजनिक बँकांनी म्युच्युअल फंड सुरू केले आणि म्हणून भारत सरकारने 1963 साली यासांबांधीत नियम तयार केले. देशातील छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांना प्रोत्सहन देण्यासाठी आणि त्यांचे हित जपण्यासाठी खासगी म्युच्युअल फंडांना सरकारने परवानगी दिली. यांनतर देशातील सर्व म्युच्युअल फंड एकत्र आले आणि त्यांनी 22 ऑगस्ट 1995 साली द असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (The Association of Mutual Fund In India) या संस्थेची स्थापना केली.
म्युच्युअल फंड चे प्रकार (Types of Mutual Funds) -
म्युच्युअल फंड चे खुप प्रकार आहेत. हे सर्व प्रकार दोन भागामध्य विभाजित केलेले आहेत त्यांची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. चला तर मग आता या प्रकारांबद्दल माहिती घेऊयात.
- संरचनेच्या आधारावर असणारे म्युच्युअल फंड - यामध्ये परत काही प्रकार आहेत, ते खालीलप्रमाणे आहेत.
- ओपन एंडेड म्युच्युअल फंड (Open Ended Mutual Fund) - ओपन एंडेड म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकदाराला मोकळेपणा दिला जातो. या फंडमध्ये गुंतवणूकदाराला कधीपण गुंतवणूक करून फंड विकत घेता येतो आणि विकत घेतलेले फंडची कधीपण विक्री करता येते.
- क्लोज एंडेड म्युच्युअल फंड (Close Ended Mutual Fund) - ओपन एंडेड म्युच्युअल फंड मध्ये असे होते कि गुंतवणूकदार वाटेल तेव्हा गुंतवणूक करता येते आणि वाटेल तेव्हा गुंतवणूक काढून घेता येते. परंतु या फंड मध्ये याच्या उलटे आहे. क्लोज एंडेड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीच अवधी ठरलेला असतो. हा ठरवलेला अवधी वेगवेगळा असू शकतो. हा देण्यात आलेला अवधी पुर्ण होईपर्यंत तुम्हाला गुंतवणूक केलेले पैसे काढता येत नाहीत आणि आणखी गुंतवणूक करता येत नाही.
- इंडेक्स म्युच्युअल फंड (Index Mutual Fund) - इंडेक्स म्युच्युअल फंड बद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल. हा फंड शेअर मार्केटच्या निगडित आहे. या मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे तुमची होणारी गुंतवणूक हि फंड मॅनेजरद्वारे शेअर मार्केटच्या स्वस्त आणि भरपूर परतावा देणाऱ्या कंपनीचे शेअर घेतले जातात.
- सेक्टर म्युच्युअल फंड (Sector Mutual Fund) - या फंड च्या नावावरून तुम्हाला समजलेच आसेल कि हा फंड कोणत्यातरी सेक्टर च्या संबंधित आहे. सेक्टर म्युच्युअल फंड या फंडमार्फत आपण विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक करू शकतो. त्यामध्ये फार्मा सेक्टर, पावर सेक्टर, फूड सेक्टर, रिअल इस्टेट सेक्टर इत्यादी.
- इंटरवल म्युच्युअल फंड (Interval Mutual Fund) - या फंड मध्ये ओपन आणि क्लोस एंडेड म्युच्युअल फंड या दोन्ही फांडच्या सुविधांचा समावेश असतो. आपल्या भाषेत सांगायचे म्हटल्यास या फंड मध्ये एक विशिष्ट कालावधीमध्ये आपण पैसे गुंतवणूक करू शकत नाही आणि केलेली गुंतवणूक काढू सुद्धा शकत नाही. या फंडमध्ये तुमचे पैसे हे शेअर मार्केटच्या NSE, BSE मध्ये गुंतवले जातात.
2. मालमत्तेच्या आधारावर असणारे म्युच्युअल फंड
यामध्ये काही प्रकार आहेत ते खालीप्रमाणे
- डेब्ट म्युच्युअल फंड (Debt Mutual Fund) - या फंड मध्ये जोखीम अगदी कमी असते. या फंड मध्ये तुम्हाला निश्चित प्रकारचा परतावा मिळत असतो. याफंड मध्ये शेअर मार्केट ऐवजी सरकारी बॉण्ड, हमीपत्र, आणि कर्जामध्ये गुंतवणूक केली जाते ती गुंतवणुक खुप सुरक्षित असते.
- लिक्विड म्युच्युअल फंड (Liquid Mutual Funds)- लिक्विड म्युचुअल फंड हा खुप सुरक्षीत फंड आहे. या फंडमध्ये गुंतवणूकदार पाहिजे त्या वेळी पैसे काढता येतात, म्हणूनच याफंड ला लिक्विड म्युच्युअल फंड म्हटले जाते.
- इक्विटी म्युच्युअल फंड (Equity Mutual Funds) - इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये प्रामुख्याने शेअर बाजार मध्ये गुंतवणूक केली जाते. जर तुम्हाला मोठा फायदा पाहिजे असेल तर हे फंड तुम्हाला तो मोठा फायदा देऊ शकतात. त्यामुळे या फंडमध्ये जोखीम सुद्धा फार जास्त असतो त्यामुळे सर्व माहिती घेऊनच गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
- ब्यालन्स म्युच्युअल फंड (Balanced Mutual Funds) - या फंड मध्ये इक्विटी आणि डेब्ट फंड या दोन्हींचा मिळून फायदा होत असतो. त्यामुळेच याला ब्यालन्स म्युच्युअल फंड असे म्हटले जाते. आपल्या भाषेत सांगायचे म्हटल्यास ज्या लोकांना वाटते आपले काही पैसे शेअर मार्केट मध्ये आणि काही पैसे सरकारी विभागामध्ये गुंतवावे तर मग हा फंड त्या लोकांसाठी आहे.
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी?
How to Invest in Mutual Funds ?
आजच्या काळात म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणे खूप सोपे झाले आहे. यासाठी भरपूर अँप्स सुद्धा उपलब्ध आहेत त्यांची मदत घेऊन आपण सहजरित्या गुंतवणूक करू शकतो. आणि हे अँप्स वापरणे खूप सोपे आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मग म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात चांगले अँप कोणते? तर इथे मी काही अँप्स सांगत आहे ( Top Apps for Mutual Funds ) त्यातून तुम्ही हि गुंतवणूक करू शकता. यामध्ये Groww App, InvesTap, KTrack Mobile App, MyCams इत्यादी अँप्स चांगले आहेत. परंतू हे अँप्स वापरण्याच्या आगोदर आणि गुंतवणूक करण्याअगोदर तुम्ही या अँप्ससंबंधित पूर्णपणे खात्री करून घ्या आणि खात्री झाल्यावरच या अँप्सद्वारे गुंतवणूक करा.
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे?
( Benifits of investment in Mutual Funds )
- म्युच्युअल फंड मध्ये पैशांची गुणवणूक करण्यासाठी फंड एजंट ची मदत घ्यावी लागते. त्याचे कारण म्हणजे एजंट लोकांना त्या क्षेत्रांतील अनुभव आणि संपूर्ण ज्ञान झालेले असते. त्यामुळे ते लोक आपले पैशे त्याच ठिकाणी गुंतवतात जिथे तुम्हाला चांगला फायदा मिळेल.
- म्युच्युअल फंड मध्ये तुमचे पैसे हे एकच ठिकाणी गुंतवले जात नाही तर ते विविध ठिकाणी गुंतवले जातात त्यामुळे आपल्याला चांगला परतावा मिळतो.
- म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला तुमची आवडीनुसार फंड निवडता येतो म्हणजेच जर तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकता तर तुम्हाला त्याप्रमाणे निवड करता येते तसेच जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला फंड निवडता येतो.
- तसेच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यावर तुम्हाला कर मध्ये काही प्रमाणात सूट भेटते.
टिप्पणी पोस्ट करा