तुम्हाला घरी काम करण्यासाठी (Work from Home) किंवा घरबसल्या शिकण्यासाठी (Learning) चांगला लॅपटॉप (Best Laptop) खरेदी करणे कठीण जात आसेल. लॅपटॉप मध्ये तसे हजारो पर्याय आहेत, कोणता लॅपटॉप खरेदी करायचा हे ठरवण्याचा प्रयत्न करताना असताना तुम्ही अक्षरशः हरवू शकता.
आज, आम्ही आसेच कोणते लॅपटॉप खरेदी करायचे हे तुम्हाला सांगू आणि ते कसे कमी पेमेंट च्या अटींवर तुम्ही खरेदी करू शकता हे देखील आम्ही सांगणार आहोत.
तुम्हाला परिपूर्ण लॅपटॉप पाहत आसल. आम्ही काही सर्वोत्कृष्ट आणि टिकाऊ लॅपटॉप निवडले आहेत ते चांगले आणि एकदम टिकाऊ आहेत. आणि या लॅपटॉप ला लोकांची पसंती देखील आहे.
घरून काम करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी आम्ही निवडलेले लॅपटॉप खालीलप्रमाणे आहेतः( Top 5 laptops)
- HP 15 (2021) - जर तुम्ही रु.50000 च्या खाली लॅपटॉप शोधत असाल तर HP 15 (2021, 15s-gr0012AU) हा एक अतिशय चांगला लॅपटॉप आहे. हा लॅपटॉप AMD Ryzen 3 CPU द्वारे समर्थित आहे. यामध्य 8GB RAM आहे. हा लॅपटॉप 1TB पारंपारिक हार्ड ड्राइव्ह आणि 256GB SSD सह येतो. HP 15 लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा फुल-एचडी डिस्प्ले आहे आणि लॅपटॉप चे वजन फक्त 2kg आहे. आणि लॅपटॉप बॉक्सच्या हा Windows 10 वर चालतो, यामध्ये Microsoft Office सह एकत्रित येते. HP 15 (2021) ची किंमत सुमारे 45,000 हजार रूपये आहे ( Top laptop under 50000 ).
- Mi Notebook Pro (MI नोटबुक प्रो ) - जर तुम्ही 60,000 किंमत च्या खाली लॅपटॉप शोधत आसल तर Xiaomi चा Mi Notebook Pro हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये इंटेल कोर चे i5 चे 11व्या जनरेशन प्रोसेसर आहे, हा लॅपटॉप 8GB RAM द्वारे समर्थित आहे आणि यामध्ये 512GB SSD चे मेमोरी आहे. पातळ आणि हलका असलेला हा लॅपटॉप Windows 10 वर चालतो. या लॅपटॉप मध्ये बॅकलिट कीबोर्ड आणि फिंगरप्रिंट सेन्सर आहे. Mi Notebook Pro ची किंमत साधारणतः रु. 57000 आहे (Top laptop under 60000). तुम्ही जुना लॅपटॉप बदलू शकता. आणि तुम्ही ऑनलाइन खरेदी करत असताना अतिरिक्त सवलत देखील मिळवू शकता.
- Lenovo Ideapad Slim 3i (लेनोवो आयडियापॅड स्लिम 3) - Lenovo IdeaPad Slim 3i हा लॅपटॉप पुरेपूर फीचरने भरलेला स्लिम लॅपटॉप आहे. जो सुमारे 58000 रु (Top laptop under 60000) मध्ये ऑनलाइन उपलब्ध आहे. लॅपटॉप हा इंटेल कोर i5 च्या 11व्या जनरेशनच्या प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. त्यामधे 8GB RAM आहे. Lenovo IdeaPad Slim 3i हा लॅपटॉप 512GB SSD सह येतो. आणि Windows 10 आणि Microsoft Office वरती चालते. यामध्ये बॅकलिट कीबोर्ड आणि फिंगरप्रिंट रीडरसह येते. Lenovo IdeaPad Slim 3i हा लॅपटॉप Windows 11 वर मोफत अपग्रेड केला जाऊ शकतो.
- Dell XPS 13 - जर तुम्ही बाजारात चांगले विंडोज-चालित मशीन पाहत असाल तर Dell XPS 13 7390 हा एक शक्तिशाली पर्याय ठरू शकते. हा लॅपटॉप 10 जनरेशन इंटेल कोर i5 प्रोसेसरसह येतो. यामध्ये 8GB RAM आणि 512GB SSD द्वारे समर्थित आहे. Dell XPS 13 हा 13.3-इंचाच्या InfinityEdge डिस्प्लेसह 1920x1080 पिक्सेलच्या नेटिव्ह रिझोल्यूशनवर चालणारे आहे. Dell XPS 13 हा Windows 10 वर चालतो आणि त्यामध्ये Microsoft Office देखील समाविष्ट आहे. Dell XPS 13 7390 ची ऑनलाइन किमत सुमारे 105000 रू आहे.
- MacBook Air (2020, M1) - जर तुम्ही Mac चा विचार करत आहात, तर Apple MacBook Air (2020, M1) हा बिनधास्त काम करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. MacBook Air (2020, M1) हा लॅपटॉप Apple च्या M1 चिपसेटद्वारे समर्थित आहे. आणि यामध्ये 8GB RAM आहे. हे 512GB SSD सोबत येते. हा लॅपटॉप तीन भिन्न रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याची बॅटरी लाइफ, ती पूर्ण चार्ज केल्यावर 18 तासांपर्यंत टिकते. प्रवास करताना तुम्हाला खूप कामं येईल. MacBook Air (2020, M1) ची किंमत साधारणपणे सुमारे 1,10,000 रू आहे.
टिप्पणी पोस्ट करा