ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड मर्यादा कशी वाढवायची आणि तपासायची | How To Increase and Check Axis Bank Credit Card Limit in Marathi

    
     तुम्हाला तुमच्या ॲक्सिस बँकच्या क्रेडिट कार्डची (Axis Bank Credit card) मर्यादा वाढवायची आहे का? जर वाढवयाची असेल तर तुम्ही ॲक्सिस मोबाईल बँकिंग ( Axis Mobile Banking) ऍप्लिकेशनद्वारे तुम्ही तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा ऑनलाइन तपासू शकता आणि वाढवू देखील शकता.

   तुमचे ॲक्सिस बँकचे क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्यासाठी पात्र असल्यास, तुम्ही ते ऑनलाइन तपासू शकता आणि तुमच्या कार्डची मर्यादा त्वरित वाढवू देखिल शकता ( increase your Axis Bank credit card limit) . तुमच्या ॲक्सिस क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी तुम्हाला कोणतेही दस्तऐवज देण्याची काहीही आवश्यकता नाही. जर तुमच्या कार्डसाठी वाढीव मर्यादा उपलब्ध आसेल तर तुम्ही तुमची मर्यादा ऑनलाइन मॅन्युअली वाढवू शकता. अक्सिस बँक क्रेडिट कार्ड मर्यादा ऑनलाइन कशी वाढवायची हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी खालील पायऱ्यांचा वापर करा.


ऑनलाइन पद्धतीने ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवा (Increase Axis Bank Credit Card Limit Online) -
  1. सर्वप्रथम तुम्ही ॲक्सिस मोबाईल बँकिंग (Axis Mobile Banking) ऍप्लिकेशन उघडा आणि लॉग इन करा.                  
  2. लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला "Credit Cards" विभाग दिसेल. त्यावर क्लिक करा आणि उघडा.      
  3. त्यांनतर तुमच्या क्रेडिट कार्डवर क्लिक करा.        
  4. त्यांनतर तुम्हाला "Total Control" ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
  5. त्यांनतर "Check for Limit Increase" वर क्लिक करा.
  6. त्यानंतर तुमचे क्रेडिट कार्ड निवडा आणि "Submit" बटन वर क्लिक करा.       
  7. पुढील स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डसाठी उपलब्ध वाढलेली मर्यादा दिसेल. त्यांनतर "Confirm" वर क्लिक करा.
  8. आता तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवली जाईल

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने