महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने राज्यातील गोर गरीब व असहाय्य वृद्धांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यामधील 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व वृद्ध व्यक्तीना आर्थिक मदत म्हणून काही ठराविक रक्कम दिली जाईल. त्याचा लाभ दर महिन्याला पेन्शनच्या स्वरूपात भेटणार आहे. त्यामुळे वृद्ध व्यक्तीना त्यांचा उदरनिर्वाह करणे सोपे होईल. महाराष्ट्रातील वृद्ध पेंशन योजनेंतर्गत ( old age pension scheme Maharashtra ) सर्व असहाय व ज्यांची आर्थिक परस्थिती दुर्बल आसलेल्या वृद्धांना दरमहा 600 रुपये दिले जाणार आहेत. जर तुम्हालाही व तुमच्या कोणी जवळच्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आम्ही योजनेबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा, योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि योजनेची पात्रता काय आसेल इत्यादींबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजना ( Old Age Pension Scheme Maharashtra ) -
- महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजना हे योजनेचे नाव आहे.
- योजनेचा विभाग हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य आहे.
- योजनेचा प्रकार केंद्र प्रायोजित योजना आसा आहे.
- योजनेचे उद्देश राज्यातील सर्व गरीब आणि असहाय वृद्ध (60 वर्षे आणि त्यावरील) यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
- योजनेद्वारे लाभाची रक्कम 600 रुपये (200 केंद्र सरकार आणि 400 राज्य सरकार) आहे.
- योजनेसाठी लाभार्थी हे महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षांवरील सर्व गरजू वृद्ध असतील.
महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजनेची उद्दिष्टे -
वृद्धकाळात असहाय्य व गरीब असलेल्या सर्व वृद्धांच्या आर्थिक सहाय्यासाठी शासनाने महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजना महाराष्ट्रात आणली आहे. ज्या वृद्ध व्यक्तीना उदरनिर्वाहासाठी इतरांवर व्यक्तीनंवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ही महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजना सुरू केली. योजनेतून त्यांना दरमहा पेन्शन म्हणून काही ठरावीक रक्कम दिली जाईल. हि रक्कम ते त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकतात आणि त्यांना कोणावर जास्त अवलंबून राहण्याची गरज नसेल. ही येणारी रक्कम 600 रुपये असून त्यापैकी 200 रुपये केंद्र सरकार आणि 400 रुपये राज्य सरकार पेन्शन म्हणून देणार आहेत.
महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजनेचा लाभ कसा राहील -
राज्यातील सर्व गरजू वृद्धांना महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजना लाभ भेटेल. वृद्धा काळात काही कारणास्तव जे व्यक्तीं संकटात जीवन व्यतीत करत आहेत अश्या सर्व वृद्धांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- म्हातारपणी वृद्ध पेंशन योजना योजनेतून 600 रुपये उपलब्ध होतील, ज्यामधून वृद्ध लोक त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतील.
- योजनेमधून येणारी रक्कम त्यांना मिळाल्यास त्यांना कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.
- महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजनेंतर्गत मिळणारी रक्कम ही वृद्धांच्या बँक खात्यात येईल. जेणेकरून फक्त तेच लोक ती रक्कम वापरू शकतील आणि कोणी त्याचा गैरफायदा नाही घेऊ शकणार.
- 65 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय आसलेल्या व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतील.
- कुणासमोर हात पसरावा नाही लागणार, ज्येष्ठांचा स्वाभिमानही या योजनेमुळे कायम राहील.
महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजनेची पात्रता पुढीलप्रमाणे
(Eligibility Criteria for Old Age Pension Scheme Maharashtra) -
खाली दिलेल्या काही अटी आहेत त्या अटी महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या अटी आहेत. त्या अटी मध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्ही महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजनेचा लाभ घेऊ शकता.
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय हे ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- अर्जदाराचे बँक मध्ये खाते असणे आवश्यक आहे. कारण योजनेद्वारे येणारी पेन्शनची रक्कम ही थेट बँक खात्यातच जमा होणार आहे.
- महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 50,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या घरातील सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
- ज्या अर्जदाराकडे बीपीएल कार्ड आहे ते या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र असतील.
महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजनेसाठी लागणारे कागतपत्रे पुढीलप्रमाणे (Required Document for Old Age Pension Scheme Maharashtra) -
महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्राची आवश्यकता आहे ते कागदपत्रे पुढीप्रमाणे आहेत.
- अर्जदाराचे आधार कार्ड.
- अर्जदाराची बँक पासबुकची झेरॉक्स कॉपी.
- अर्जदाराचे वय प्रमाणपत्र पाहिजे.
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- अर्जदाराचे ओळखपत्र
- अर्जदाराचा मोबाईल नंबर
- अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
- बीपीएलच्या यादीत नाव आल्यास त्याची झेरॉक्स कॉपी आवश्यक आहे.
महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजनेसाठी अर्ज कसा करावा? (How to apply Old Age Pension Scheme Maharashtra) -
- सर्वप्रथम तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालय मध्ये जावे लागेल.
- तिकडे जाऊन तुम्हाला महाराष्ट्र वृद्ध पेंशन योजनेअंतर्गत लाभार्थी होण्यासाठी अर्ज भरून द्यावा लागेल.
- आता अर्जामध्ये सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला अर्जासोबत लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
- त्यानंतर तुम्हाला तो योजनेचा अर्ज तेथे सबमिट करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची अर्जची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल.
- तुम्ही अर्जामध्ये भरलेली माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
- तुमच्या अर्जाची संपूर्ण पडतळणी केल्यानंतर जर तुम्ही या योजनेमध्ये पात्र असाल तर तुमची पेन्शन सुरू होईल.
अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या टोल फ्री क्रमांक वर संपर्क करू शकता. किंव्हा ह्या संकेस्थळावर भेट देऊ शकता https://sjsa.maharashtra.gov.in/
टोल फ्री क्रमांक – 1800 120 8040
टिप्पणी पोस्ट करा