कारोनाच्या परीस्तीतीमुळे सध्या कॉर्पोरेट क्षेत्रातील बहुसंख्य कर्मचारी वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत आहेत. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपतपर्यंत अनेकजण काम करत आसतात. त्यामधील महिलांना घरचे सगळे काम करून ऑफिसचे देखील सगळे काम करावे लागते. ऑफिसचे काम करत असताना खुपसाऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण हा येतो. हा तुमच्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी आज आपण काही टिप्स पाहणार आहोत. चला तर मग पाहूया.
तणाव दुर ठेवण्यासाठी काही पर्याय -
1) चांगली झोप घेणे हे ताणतणाव दूर करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. दिवसभर काम केल्यानंतर रात्री संपूर्ण आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.
2) नियमितपणे व्यायाम करणं देखील आवश्यक आहे. त्याबरोबरच संतुलित आहार देखील खुप महत्त्वाचा आहे.
3) ताण तणाव दूर करण्यासाठी कधीकधी आपल्याला आपली कार्यशैली किंवा वातावरण देखील बदलण्याची गरज आसते.
4) ज्या कंपनी मध्ये तुम्ही काम करता तेथे जर तुम्हाला ताणतणाव वाटत आसेल तर लगेच तुमचा वरिष्ठ अधिकाऱ्यांला सांगा. कोणत्याही प्रकारचे शोषण होत असल्यास तुम्ही तुमच्या HR विभागाला सूचित करा.
5) जर तुम्हाला अधिकच ताणतणाव वाटत आसेल तर लगेच तुम्ही डॉक्टर सोबत संपर्क साधा. ते तुम्हाला काही मदत करू शकतील.
ताणतणावची कारणे पुढीलप्रमाणे आसू शकतात -
1) तुम्हाला तुमच्या नोकरीबद्दल खात्री नसणे.
2) तुम्हाला तुमच्या कामाचे टेन्शन असणे.
3) तुम्हाला तुमच्या पोस्टनुसार चुकीची पात्रता असणे.
4) तुमच्या मनासारख्या गोष्टी नाही घडणे.
5) तुमच्या घरचे वातावरण ठीक नसणे.
टिप्पणी पोस्ट करा