आपण सगळेच व्हॉट्सअॅॅप (WhatsApp) चा वापर करतोच. व्हॉट्सअॅॅप (WhatsApp) वरती आपण आपल्या खास व्यक्तींना मॅसेज पाठवत असतो. तसेच काही सणाला शुभेच्छा,आपला घरगुति काही कार्यक्रम आसेल त्याचे निमंत्रण अश्यावेळी आपण लोकांना मॅसेज पाठवतो. आपल्याला हे माहित आहे की, व्हॉट्सअॅॅपवर (WhatsApp) एका वेळी फक्त पाच जणांनाच मेसेज पाठवता येतात.
अशा वेळी, जर तुम्हाला एकाच वेळी व्हॉट्सअॅपवर अनेकांना सणाच्या शुभेच्छा, आपल्या घरगुती कार्यक्रमचे आमंत्रण द्यायच्या आसेल, तर त्यासाठीही एक पर्याय आहे. याच्यासाठी एक ट्रिक आहे मित्रांनो. त्याची मदत घेऊन तुम्ही एकाच वेळी 256 लोकांना मेसेज पाठवू शकता. यासाठी व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) एक सोपा मार्ग म्हणजे ब्रॉडकास्ट (Broadcast) लिस्ट तयार करणे. याची मदत घेऊन तुम्ही एकाच वेळी आनेक लोकांना संदेश पाठवू शकता. ब्रॉडकास्ट (Broadcast) मध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी सर्व कॉन्टॅक्ट्स सिलेक्ट करण्याची गरज नसते. या फीचरसह जर तुमचा संपर्क क्रमांक रिसीव्हरच्या फोनमध्ये सेव्ह केलेला असेल, तर त्यांना तुमचा संदेश सामान्य खाजगी चॅटप्रमाणे मिळेल. जर त्यांनी मेसेजला रिप्लाय दिला तर तुम्हाला तेही नक्की मिळेल.
तर चला मग पाहूया ब्रॉडकास्ट (Broadcast) कसे बनवतात.
1) सर्वप्रथम तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅॅप (WhatsApp) ओपन करा.
2) व्हॉट्सअॅॅप (WhatsApp) मध्ये तुम्हाला वरील उजव्या बाजूला 3 डॉट दिसतील त्याच्यावर क्लीक करा.
3) त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे New Broadcast दिसेल त्याच्यावर क्लीक करा.
4)त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचे सवे केलेले कॉन्टॅक्ट दिसतील. तुम्हाला तुमच्या ब्रॉडकास्ट (Broadcast) ज्या व्यक्तींना जोडायचे आहे त्यांचा नावावर क्लिक करा.
5) त्यानंतर बरोबरच्या खुनी वर क्लीक करा.
6) आता तुमचे ब्रॉडकास्ट (Broadcast) तयार झालेले आसेल. आता तुम्ही एकाच वेळी 256 लोकांना मॅसेज पाठवू शकता.
टिप्पणी पोस्ट करा