गेले काही दिवसापासून कोरोना मुळे सर्वच शाळा ऑनलाईन पद्धतीने चालू होते. त्यामुळे खुप विद्यार्थ्यांच अभ्यासातून रस उडाला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी मोबाइल कडे जास्त लक्ष देतात आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. आणि यामुळे पालक त्रस्त आहेत, मुलं अभ्यासच करत नाहीत असे अनेक पालकांचे म्हणणे आहे. परंतु तुमच्या मुलांची अभ्यासाची जबाबदारी ही तुमच्यावर आहे. त्यामुळे आज आपण काही आश्या चांगल्या सवयी पाहणार आहोत ज्या पालकांनी स्वतःला लावून घेतल्या तर तुमची मुलंही अभ्यास करू लागतील. तर चला मग पाहूया काय आहे ते.
मुलांसमोर पालकांनी हे करावे -
घरातील चांगले वातावरण हे मुलांवर प्रभाव पाडत आसते. आणि तुम्हीच जर फोन चा जास्त वापर करत असाल तर त्याचा मुलांवर देखील प्रभाव पडतो. त्यामुळे मुलांसमोर तुम्ही फोन ठेवून पुस्तके वाचलीत तर त्यालाही ही सवय नक्कीच लागेल. म्हणूनच तुम्ही मुलासमोर पुस्तकं वाचलीत तर तुम्हाला पाहून मुले देखील पुस्तके वाचतील.
मुलांना गृहपाठ द्या -
ज्या वेळेस तुमची मुले एखादे पुस्तक वाचत असेल त्या वेळेस मुलाला त्याचा सारांश लिहायला सांगा. यामधून फायदे नक्की होतील. ते म्हणजे तो जास्त लक्ष देऊन पुस्तक वाचेल आणि त्याचा लिहण्याची सराव देखील होईल. त्यामुळे मुलांचा पुस्तकमध्ये रस वाढेल आणि त्यांचे ज्ञान देखील वाढेल आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल.
मुलांना आनेक प्रकारच्या गोष्टी सांगा -
मुलांना तुमच्या काळातील फेमस गोष्टी सांगा, लोकप्रिय पुस्तकाबद्दल सांगा, साहित्याविषयी माहिती द्या, त्यामुळे त्यांचा साहित्यामध्ये देखील रस वाढेल. यामुळे काय होईल त्यांची पुस्तकामध्ये रस वाढेल आणि ते देखील अभ्यास करू लागतील.
टिप्पणी पोस्ट करा