किसान क्रेडिट कार्ड भेटत नसेल तर इकडे करा तक्रार | Kisaan credit card 2022

     
     भारत सरकार शेतीसाठी व आपल्या शेतकरी बांधवांसाठी विविध योजना प्रकारच्या योजना राबवित आसते. त्या विवीध प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सम्पूर्ण मदतीचा हात देण्यात येतो असतो. आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेली एक योजना आहे 'किसान क्रेडिट कार्ड' तसेच केसीसी ( KCC). 'किसान क्रेडिट कार्ड' योजनेच्या अंतर्गत गोर गरीब शेतकरी बांधवांना खुप कमी व्याजदरात बँकांकडून कर्ज घेता येते. केसीसी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कुठल्याही हमीशिवाय 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू भेटते आणि जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचे कर्ज केवळ 7 टक्के ह्या व्याजावर भेटते आणि नियमित कर्जफेड केल्यावर त्याच्यावर 3 टक्के सूटही भेटते. किसान क्रेडिट कार्ड ह्या योजनेचा लाभ प्राप्त करताना शेतकऱ्यांना खुप अडचणींना सामोरे जावे लागत आहे आसे बातम्या बाधून पाहायला भेटत आहे. परंतु, अनेक बँका शेतकऱ्यांना या योजनेतून कर्ज देण्यास नकार किंव्हा टाळाटाळ करतात आसे समोर आले आहे. अनेक बँक शेतकऱ्याना योजनेचा लाभ देताना अडवणूक करताना आसे आरोप अनेक शेतकऱ्यांनीही केला आहे. 

शेतकऱ्यांना माहिती नाही पण शेतकऱ्यांना बँकेविरोधात तक्रार करण्याचा अधिकार आहे. तर शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. अशा बँकांविरोधात शेतकऱ्यांना तक्रार करता येते. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार शेतकऱ्यांनी अर्ज केल्यावर बँकांना 15 दिवसाच्या आत किसन क्रेडिट कार्ड हे करून द्यावा लागते. जर त्यांनी तसे नाही केल्यास शेतकरी तक्रार करु शकतात.

जर बँकेचे अधिकारी तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड देण्यास नकार करीत असतील, तर तुम्ही बँकिंग लोकपालाकडे तक्रार करू शकता. आणि ह्या संकेतस्थळावर पण तक्रार करता येते https://cms.rbi.org.in/cms/indexpage.html#eng . किसन क्रेडिट कार्ड हेल्पलाईन क्रमांक 0120 6025109/155261 या क्रमांकावरही तुम्ही संपर्क करून सांगू शकता.

किसन क्रेडिट कार्ड साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे -
1) मतदार ओळखपत्र
2) पॅनकार्ड
3) पासपोर्ट
4) आधारकार्ड
5) ड्रायव्हिंग लायसन्स




टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने