आता यापुढे जे लोक नविन पासपोर्टसाठी अर्ज करणार आहेत व ज्या लोकांचे पासपोर्ट बुक संपले आहे, यालोकांसाठी भारत सरकार ई पासपोर्ट (ePassports) जारी करणार आहे. ई पासपोर्ट (ePassports) झपाट्याने जागतिक मानक बनत आहेत. ई पासपोर्ट (ePassports) मुळे आंतरराष्ट्रीय प्रवास सोपा होईल आणि त्याने इमिग्रेशन ची प्रक्रिया पण जलद आणि सोपी होईल. ट्रॅव्हल पासपोर्ट हा सुरक्षित बायोमेट्रिक डेटावर आधारित असेल.
नवीन ई पासपोर्ट (ePassports) चा हेतु काय आहे..
सध्या भारतामध्ये भारतीय नागरिकांना दिले जाणारे पासपोर्ट हे बुकलेट वरती छपलेले आसतात. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने (ICAO) ठरवून दिलेल्या आंतरराष्ट्रीय हक्कानुसर सरकार त्यात आता सुधारणा करू इच्छित आहे. या सुधरणतेच्या प्रक्रियेमध्ये दोन वेगळ्या वेगळ्या योजना आहेत. पहिले योजना ई पासपोर्ट आहे. त्यामधे नॉन-इलेक्ट्रॉनिक पासपोर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप टाकून त्याचा सुरक्षिततेचा एक स्तर वाढवते. ते पासपोर्टच्या पृष्ठ 2 वर दिसणारी माहिती तसेच डिजिटल सेक्युरिटी करते. हे डिजिटल सिक्युरिटी वैशिष्ट्य प्रत्येक देशासाठी 'डिजिटल स्वाक्षरी' आहे. भारत सरकार ने चाचणी करत 20,000 अधिकृत आणि राजनैतिक ई-पासपोर्ट जारी केले होते त्यामधे इलेक्ट्रॉनिक मायक्रोप्रोसेसर चिप टाकली होती. दुसरी योजना पूर्णपणे डिजिटल पासपोर्ट सादर करण्याची आहे ज्यामध्ये तुम्ही मोबाईल फोनवर देखील पासपोर्ट घेऊन जाऊ शकतात.
ई पासपोर्ट (ePassports) चे काय फायदे आहेत..
ई पासपोर्ट (ePassports) मुळे ट्रॅव्हल पासपोर्ट ची सुरक्षा देखील वाढेल. प्रवाशांसाठी इमिग्रेशन काउंटरवर जास्त वेळ लागणार नाही. वाढीव सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करणार्या देशांच्या अटीमध्ये आपल्या पासपोर्टला लवकर स्वीकारले जाईल. भारतीय नागरिक सध्या 58 देशांमध्ये आधीच्या व्हिसाशिवाय प्रवेश करू शकतात.
ई पासपोर्ट (ePassports) कधी सुरू होणार?
भारतीय पासपोर्टची वैशिष्ट्ये आणि लूक मध्ये सुधारणा करण्याचा विचार गेल्या काही दिवसापासून सुरू आहे.
सध्याच्या पासपोर्ट जारी केलेल्या प्रणालीमध्ये वैयक्तिकरण प्रणालीचे घटक समाविष्ट केल्यानंतर भारतामधील सर्व 36 पासपोर्ट कार्यालये ई पासपोर्ट जारी करण्यासाठी सज्ज आहेत.
टिप्पणी पोस्ट करा