सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(SEBI) ची स्थापना हि 12 एप्रिल 1992 रोजी करण्यात आली आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ही सिक्युरिटीजमध्ये जे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण, सिक्युरिटीज मार्केटच्या विकास करण्यासाठी आणि त्यांच्या नियमाचे पालन करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. हि संस्था संसदेच्या कायद्यानुसार स्थापन केलेली वैधानिक नियामक संस्था आहे.
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI Recruitment 2022) मध्ये सध्या अधिकारी ग्रेड A (सहाय्यक व्यवस्थापक) पदासाठी 120 जागांसाठी भरती आहे.
1) अधिकारी ग्रेड A (सहाय्यक व्यवस्थापक) जागा व शैक्षणिक पात्रता -
1)जनरल पदासाठी 80 जागा आहेत. त्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे.
2) लीगल पदासाठी 16 जागा आहेत. त्यासाठी विधी पदवी (LLB) पाहिजे.
3) IT पदासाठी 14 जागा आहेत. त्यासाठी इंजिनियरिंग मध्ये पुढील शाखेतील पदवी - इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ IT/ कॉम्प्युटर सायन्स , किंव्हा MCA पुर्ण पाहिजे.
4 )रिसर्च पदासाठी 07 जागा आहेत. त्यासाठी सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय प्रशासन (वित्त) / इकोनोमेट्रिक्स यामध्ये पदवी पाहिजे.
5) अधिकृत भाषा पदासाठी 03 जागा आहेत. त्यासाठी इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी पाहिजे.
सर्व पदासाठी वय मर्यादा हि 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 30 वर्षे पुर्ण आसवे. मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सुठ आहे. आणि ओबीसी साठी 3 वर्ष सूठ आहे. जनरल आणि ओबीसी कॅटेगरी मधील तरुणांना 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गयांसाठी 100 फी आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी आहे. आणि नौकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.
अधिक माहितीसाठी पुढील संकेत स्थळावर जा - https://www.sebi.gov.in/
चांगली संधी
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा