मागील दोन ते तिन वर्षापासून कोरोना व्हायरस (Corona Virus) याने सर्व जगाला हैरान केले आहे. आलिकडेच हळुहळू परिस्थिती चांगली होत असतानाच साऊथ आफ्रिकेमध्ये कोरोना व्हायरसचा 'ओमिक्रॉन' (Omicron) हा नवा व्हेरिएंट भेटला. जागतिक आरोग्य संघटनेनंही (World Health Organisation- WHO) त्याला खूप घातक अशा सांगितले आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात खुप काळजी घेतली जात आहे. भारतातही आतापर्यंत ओमिक्रॉनचे खुप रुग्ण आहेत त्यामुळे संपूर्ण देशभरातील आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर आहे.
कारोना व्हायरसचा जास्त प्रसार होऊ नये म्हणून युनिव्हर्सल पास (Universal Pass) सक्तीचा करण्यात आलेला आहे. रेल्वे, विमान, सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक बस यांमधून प्रवास करण्यासाठी तुम्हाला युनिव्हर्सल पास गरजेचा आहे ,आणि मॉल, सिनेमाघर, नाटय़घर अशा ठिकाणी आता ‘युनिव्हर्सल पास’ बंधनकारक करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वांना युनिव्हर्सल पास काढणं हे गरजेचं आहे. ज्या व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना युनिव्हर्सल पास भेटल. युनिव्हर्सल पास (Universal Pass) कसा भेटेल याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत.
युनिव्हर्सल पास (Universal Pass) काढण्यासाठी पुढील पायऱ्या चा वापर करा -
1) सर्वप्रथम तुम्ही https://epassmsdma.mahait.org/login.htm ह्या संकेत स्थळावर जा.
2) त्यानंतर तिथे Universal Pass for Double Vaccinated Citizens या पर्याय वर क्लिक करा.
3) त्यानंतर तुम्ही कोरोना चा डोस घेताना जो मोबाइल नंबर दिला आहे तो विचारतील तो मोबाइल नंबर तिथे टाका, आणि Send OTP वर क्लिक करा.
4) त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर वरती जो OTP येईल तो OTP तेथे टाका. आणि Submit वरती क्लीक करा.
5) त्यानंतर पुढे गेल्यावर Generate Pass वरती क्लीक करा.
6) त्यानंतर ते तुम्हाला तुमचा फोटो टाकावा लागेल तिथे तुमचा फोटो टाका, आणि I Confirm photo is good for universal pass and need no changes या वरती टिक करून Apply वरती क्लीक करा.
7) Apply केल्यानंतर तुम्हाला तुमचा युनिव्हर्सल पास (Universal Pass) 24 तासानंतर तुम्हाला तुमचा फोन वर मॅसेज(SMS) येईल.
8) त्या आलेल्या एसएमएस मध्ये तुम्हाला लिंक भेटेल त्यावरून तुम्हाला तुमचा युनिव्हर्सल पास (Universal Pass) डाउनलोड करता येईल.
टिप्पणी पोस्ट करा