पुढील येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असणार आहे, त्या येणाऱ्या इलेक्ट्रिक काळाने जगभरातील अनेक कंपन्यांना आकर्षित केले आहे. जपानची प्रसिद्ध कंपनी सोनीही (Sony) या शर्यतीत सामील होणार आहे. सोनीने कंपनी CES 2022 येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या कंपनीतर्फे इलेक्ट्रिक कार आणणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये त्यांनी Sony Mobility Inc या नव्या कंपनीचीही घोषणा केली आहे. या कंपनीचं 2022 मध्ये मार्चनंतर अधिकृत लॉंच करण्यात येईल. सोनी (Sony) कंपनीने शोमध्ये 7-सीटर SUV Vision-S 02 चा प्रोटोटाइप सादर केला आहे. CES 2020 मध्ये त्यांनी जी कार दाखवण्यात आली होती त्याचे SUV Vision-S 02 हे नाव देण्यात आले आहे. ह्या कारला प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनी आणखी कार मॉडेल आणि ट्रक बाजारामध्ये आणण्याचा विचार करणार आहे.
यामुळेच येणाऱ्या दोन-तीन वर्षात सोनी कंपनी (Sony) च्या कार्स आपल्याला नक्कीच रस्त्यावर धावताना पाहायला मिळू शकतील. सध्या अनेक कंपन्या या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न करत असून सोनीची विश्वासार्हता त्यांना नक्कीच मोठा ग्राहकवर्ग मिळवून देऊ शकते.
सोनी यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. कार बद्दल युजर इंटरफेसच्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांचा तपशील व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. कार 5G कनेक्टिव्हिटीसह रिमोट वर चालणारी आहे. परंतु, सोनीची ही कार कधी लॉन्च होणार हे सध्यातरी कोणाला माहीत नाही. पण सोनी इलेक्ट्रिक कारच्या भविष्यासाठी नियोजन करत आहे. सोनी कंपनीचे अध्यक्ष, सीईओ आणि चेअरमन केनिचिरो योशिदा म्हणाले, "आम्ही सोनीच्या इलेक्ट्रिक वाहनाच्या व्यावसायिक प्रक्षेपणाचा शोध घेत आहोत."
टिप्पणी पोस्ट करा