थोर समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे पुणे मध्ये निधन झाले आहे. स्वताच्या वयक्तिक जिवनात अनेक अडचणी असून देखील आपले संपुर्ण आयुष्य अनाथ मुलांच्या सेवेसाठी समर्पित केले. प्रेम आणि करूनाचे प्रतिक म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जात होते.
७४ वर्षीय सिंधुताई यांनी पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. महिनाभरापूर्वी त्यांना हर्नियाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री 8.10 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. आजारामुळे त्यांचा वर शस्रक्रिया देखील करण्यात आली होती.
सिंधुताई सपकाळ, यांना “माई” म्हणून ओळखले जात होते. त्या पुणे येथील हडपसर येथे एक अनाथाश्रम – सन्मती बाल निकेतन संस्था चालवत होत्या. व प्रभुणे पुनरुत्थान समरसता गुरुकुलम नावाची स्वयंसेवी संस्था चालवतात. त्यांची NGO पारधी समाजाच्या आणि त्यांच्या मुलांच्या उन्नतीसाठी चांगले काम करते. ते पारधी मुलांसाठी शाळा आणि त्यांचा राहण्याची सुविधा देतात.सिंधुताई यांनी त्यांच्या जीवनामध्ये 1,000 हून अधिक अनाथ मुले दत्तक घेतली आणि त्यांचे पोषण केले. समाजसेवेसाठी त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना महाराष्ट्राची मदर तेरेसा म्हणून देखील ओळखले जात होते.
टिप्पणी पोस्ट करा