Top 10 रोमांचक मराठी वेबसिरीज ( Webseries )

     आम्ही घेऊन आलो आहोत तुमचा साठी Top 10 मराठी वेब सिरीज.त्यामधे आहेत action, romance, thriller, comedy. तर चला मग जाणुन घेऊया कोण कोणत्या आहेत त्या वेब सिरीज.


10) वन्स अ एअर ( Once A Year )

हि वेब सिरीज तुम्हाला MX Player वरती पाहायला भेटेल. एक गोड आणि मस्त रोमँटिक कॉमेडी आहे. वन्स अ इयरमध्ये चे चित्रपट निर्माते निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले हे आहेत. आणि मंदार कुरुंदर हे दिग्दर्शक आहेत. दोन अतिशय भिन्न लोक एकमेकांना कसे भेटतात. एकमेकांचे मित्र बनतात.त्यानंतर त्यांच्यातील आकर्षण वाढते. आणि मग ते प्रेमात पडतात. आणि मग त्यांचे नाते कसे तळाशी जाते हे या वेब सिरीज मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या शोची सुंदर गोष्ट म्हणजे, दोन पात्रांमधील संवादाची बौद्धिक देवाणघेवाण आणि त्यांची कथा 18 वर्षापासून ते 24 वर्षांच्या वयापर्यंत कशी दाखवली आहे. तुम्ही हा वेब सिरीज पाहत असताना आसे वाटेल की तुम्ही त्यांची लाईफ जगत आहात.


9) आणि काय हवं? ( Ani Kay Hava?)

ही वेब सिरीज वरुण नार्वेकर लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनी काय हव यामध्ये प्रिया बापट आणि उमेश कामत अभिनीते आहेत.अनी काय हवा हि वेब सिरीज पुण्यातील विवाहित मध्यमवर्गीय जोडप्याच्या जीवनातील आनंदी प्रेमकथा आहे. याचे दोन सीझन आहेत. शो दोघे एकमेकांवर कसे प्रेम करतात आणि एकत्र स्वप्न पाहतात याचावर आहे.


8) मुविंग आउट ( Moving Out )

ही एक स्वतंत्र स्त्रीची कथा आहे.ती तिच्या आईवडिलांच्या घरातून बाहेर पडून जीवनाचा शोध घेते. स्वतःच्या पायावर उभी राहते. हा शो अनौपचारिक लैंगिकता आणि स्त्रियांना रोजच्यारोज तोंड द्यावे लागणार्‍या असमानतेबद्दल सांगतो. शोमधील मध्यवर्ती पात्र रीवाला बाहेर पडायचे आहे, परत लढायचे आहे आणि तिच्या स्वताच्या आटिवर जीवन जगायचे आहे. ही वेब सिरीज Reverb Katta या YouTube channel वर पहायला भेटेल.


7) सेफ जर्नीज ( Safe Journeys )

सेफ जर्नीज वेब सिरीज चे आठ भाग आहेत. प्रत्येक भाग लैंगिक संबंधित समस्यांचे वेगवेगळे पैलू बद्दल माहिती देतो. सुरक्षित लैंगिक संबंध, गर्भधारणा, लैंगिक शोषण आणि तरुणांमधील संमती यावर संवादाला प्रोत्साहन देण्यासाठी ही वेब सिरीज बनवली आहे. या मालिकेत पर्ण पेठे, सुव्रत जोशी, शिवानी रांगोळे, अक्षय टंकसाळे, रुतुराज शिंदे, दिप्ती कचरे आणि मृण्मयी गोडबोले यांसारखे प्रसिद्ध मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते आहेत. हि वेब सिरीज तुम्हाला YouTube वर पहायला भेटेल.


6) पांडू ( Pandu )

ह्या वेब सिरीज मध्ये तुम्हाला मुंबई शहरातील एका पोलिसाच्या दैनंदिन जीवनाची कहाणी पाहायला भेटेल. हा शो एक विनोदी आहे आणि पोलिस अधिकाऱ्याची मानवी बाजू दाखवतो. पांडू भ्रष्ट नाही, तो हिरोही नाही, त्याला फक्त आपल्या मुलाचे चांगले पालन पोषण करायचे आसते. पांडूमध्ये सुहास सिरसाट आणि दिग्गज अभिनेते दीपक शिर्के यांच्या प्रमुख भूमिका आहे. ही वेब सिरीज तुम्हाला MX Player वरती पाहायला भेटेल.


5) शाळा ( Shala)

 ही तीन शाळकरी मित्रांची कथा आहे. ते आपल्या जीवनात दररोज येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातात हे यात दाखवले आहे. ही एक छोट्या शाळेतील गोष्ट आहे जी तुम्हाला भारतातील अंतर्गत भागातील विद्यार्थ्यांच्या जीवना बद्दल सांगते.ही वेब सिरीज तुम्हाला YouTube वर पहायला भेटेल.


4) गोंद्या आला रे ( Gondya aala re )

गोंद्या आला रे ही ZEE5 मराठी ची ॲक्शन ड्रामा वेब सिरीज आहे. याचे दिग्दर्शन अंकुर काकतकर यांनी केले आहे.यामधे भूषण प्रधान, क्षितीश दाते, शिवराज वायचळ, आनंद इंगळे आणि सुनील बर्वे  अभिनेते आहेत. ही वेब सिरीज चापेकर बंधूंच्या नेतृत्वाखाली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात झालेल्या पहिल्या क्रांती बद्दल आहे. ही वेब सिरीज तुम्हाला ZEE 5 ॲप वरती पाहायला भेटेल.


3) काळे धंदे ( Kaale Dhande )

काळे धंदे हा महेश मांजरेकर, संस्कृती बालगुडे आणि शुभंकर तावडे यांचा मराठी कॉमेडी वेब सिरीज आहे. ही कहाणी विकी या तरुण छायाचित्रकाराभोवती फिरत असते. विविध अनपेक्षित परिस्थितींमुळे त्याचे जीवन कसे बदलते हे सांगते. गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी हताश होऊन तो आणखी गोंधळ करतो. ही वेब सिरीज तुम्हाला ZEE 5 ॲप वरती पाहायला भेटेल.


2) हाय टाईम ( High Time )

हाय टाईम वेब सिरीज चे सहा भाग आहेत.ही डार्क कॉमेडी वेब-सिरीज आहे. या सिरीज मध्ये आशुतोष गोखले, क्षितीश दाते, साईनाथ गणुवाड, शब्दार्थ महाशब्दे, केतकी नारायण आणि तन्वी कुलकर्णी हे अभिनेते आहेत. ही चार मित्रांची कथा आहे जे त्यांचे जीवन आणि अपयश एकत्र पाहत आसतात. हि वेब सिरीज तुम्हाला YouTube वर पहायला भेटेल.


1) समांतर ( Samantar )

समंतरमध्ये स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका आहे. हि वेब-सिरीज आगोदर मराठी मध्ये बनवण्यात आली होती आणि नंतर ती हिंदी, तेलगू आणि तमिळमध्ये डबिंग करण्यात आली. याचे सतीश राजवाडे हे दिग्दर्शक आहेत, समांतर हा सुहास शिरवळकर यांच्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. यामधे नितीश भारद्वाज आणि तेजस्विनी पंडित यांची पण भूमिका आहेत.हि थ्रिलर वेब सिरीज तुम्हाला MX Player वरती पाहायला भेटेल.



1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने