अरुंधती आणि अशितोष मध्ये उमलत आहे नवीन नाते ते पाहून अनिरुद्ध ला येतोय राग..Aai kuthe kay karte

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या अरुंधतीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आलेले आहेत. तिच्या लेकाचं अभिषेकचं लग्न होतंय. तर, खूप वर्षां नतर तिचा कॉलेजचा मित्र तिला भेटला आहे. त्याच्यात अनिरुद्धने केलेल्या फसवणुकीच्या दु:खातून ती आता सावरतेय असे दिसत आहे. यामध्येच तिला तिचा कुटुंबातील सदस्य आणि तिचे मित्र आशुतोष तिला मदत करताना दिसत आहेत. मात्र, आशुतोष आणि अरुंधती यांचात होत असलेली मैत्री अनिरुद्धच्या डोळ्यात खूपच टोचलेलि पाहायला मिळत आहे.


स्टार प्रवाह यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये अभिषेकच्या लग्नातील चालू आसेलेल्या संगीत सोहळ्याचे काही क्षण दाखवण्यात आले आहेत. त्यामधे घरातील सगळे जण स्टेजवर येऊन डान्स करताना दिसत आहेत.यामध्ये आशुतोष आणि अरुंधती एकत्र डान्स करत आहेत. ते पाहून अनिरुद्ध खूप नाराज होतोय. एवढेच नाही तर, संजना त्याला डान्स करण्याचा आग्रह करत आहे. पण, तो तिला नकार देतोय.


अरुंधती आणि आशुतोष यांच्यामधील मैत्री अनिरुद्धला पहिल्यापासूनच खटकत आहे. त्यामुळे त्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो आशुतोषचा अपमान करायचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे आशुतोषला कॉलेजमध्ये असल्यापासून अरुंधती खुप आवडते. परंतु, सध्या तिच्या आयुष्यात चालु असलेल्या घडामोडींमुळे तो फक्त तिचा आता एक चांगला मित्र म्हणून वागत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने