महिलांना मिळणार 5000 हजार रुपये,मोदी सरकारची भन्नाट योजना...

    
    मोदी सरकार विविध नवीन व विविध समाज बांधवांनसाठी विविध प्रकारच्या योजना घेवून येतच आसते. असेच मोदी सरकारने गावाकडील खेड्यातील राहणाऱ्या महिलांनसाठी नवीन योजना आणली आहे,तिचे नाव आहे ' ओव्हर ड्राफ्ट फॅसिलिटी '(Over Draft facility).

    ग्रामीण विकास विभागाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा यांनी स्वतंत्र अमृतममहोत्सव निम्मित ही योजना सुरू केली आहे.ही योजना त्यांनी अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत सुरु केली. त्याअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना 5,000 रुपयांचा 'ओव्हर ड्राफ्ट' देण्यात येणार आहे.
 
   या सुविधेमुळे महिलांना बँक खात्यातून शिल्लक रकमेपेपेक्षा जादा पैसे काढता येतील. त्यानंतर एका निश्चित कालावधीत ही रक्कम परत भरावी लागणार आहे. त्यावर व्याजही आकारले जाणार आहे. महिलांसाठी ऐका प्रकारचे कर्जच आहे. 

    कुठलीही बँक किंवा बिगर बँकिग वित्तीय कंपनी (NBFC) 'ओव्हर ड्राफ्ट' ची सुविधा देऊ शकतात. आणि, वेगवेगळ्या बँका आणि 'एनबीएफसी' साठी ही मर्यादा वेगळी असू शकते.

  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2019-20 च्या अर्थसंकल्पीय भाषणात या योजने बाबत घोषणा केली होती. त्यानुसार ग्रामीण भागातील महिला बचत गट सदस्यांकरिता ही सेवा सुरु करण्यात आली आहे. महिला बचत गटातील सदस्यांना ही सुविधा चा लाभ मिळणार आहे.

'ओव्हर ड्राफ्ट' सुविधा सुरु करण्यासाठी भारतीय बँक संघाने सर्व बँकाना सूचना केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने