थंडी मध्ये हे लाडू आहेत शरीरासाठी पौष्टिक, मेथीचे लाडू..

      
     हिवाळा ऋतु मध्ये आपण जो काही आहार घेतो तो हमखास पचतो, त्यामुळे हिवाळ्यात वजन पण वाढते. तसेच थंडी मध्ये मेथीचे लाडू पण खूप पोष्टिक आसतात. मेथीचे लाडू खाल्ले ने डाएट वर पण नियंत्रण राहते.मेथी चे लाडू शरीरासाठी खुप गुणकारी आसतात.

मेथीचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे आहे -

1) अर्धा कप गावरान तूप घ्या.
  
2) 1 वाटी गव्हाचं पीठ घ्या.

3) 1 टेबल स्पून मेथी घ्या.

3) 2 टी स्पून बडिशेप घ्या.

4) 1 छोटा चमचा सुंठाची पावडर घ्या.

5) ¾ कप गुळ किंवा साखर घ्या.



मेथीचे लाडू बनवण्याची कृती खालीलप्रमाणे आहे -

1)एक कढई घ्या. त्यानंतर कढईमध्ये तूप गरम करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये गव्हाचे पिठ टाका, पिठ टाकल्यावर ते मंद आचेवर भाजून घ्या.

2) अर्धा तास पिठ चांगले भाजुन घ्या. पिठ भाजल्यानंतर सोनेरी रंगाचं झाले कि त्यानंतर गॅस बंद करा. हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्या. हे मिश्रण पूर्णपणे थंड झाले नाही आणि तुम्ही यामध्ये साखर एकत्र केली तर मिश्रण कोरडं होईल. 

3) आणखी दुसरी कढई घ्या.त्या दुसऱ्या कढईमध्ये मेथी व बडिशेप टाका व ते भाजून घ्या, नंतर ते मिक्सरमध्ये बारिक करा.

4) जेव्हा पिठाचं मिश्रण पूर्णपणे थंड होईल त्यानंतर त्यामध्ये साखर टाका, आणि बारिक केलेलं मिश्रण टाका. आता सुंठ घालून मिश्रण एकत्र करा.

5) तुम्ही या मिश्रणामध्ये काजु, बदाम, पिस्ते पण वापरू शकता.

6) सगळे मिश्रण व्यवस्थित एकत्र केल्यानंतर हाताने लाडू बनवून घ्या.


झाले चवदार आणि पौष्टिक मेथीचे लाडू.


टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने