विविध प्रकारची नोकरी व विविध प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या महिला यांच्याकडे पैसे येतात त्यामुळे त्यांचे भविष्य चांगले आहे. पण मग, घर सांभाळणाऱ्या गृहिणींचे भविष्याचे काय होईल..? त्या जे कष्ट करतात त्याचे त्यांना काहीच मोबदला भेटत नाही.. अशा गृहिणी असणाऱ्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे..
मोदी सरकारने खास अशा गृहिणींसाठी योजना आणली आहे. या योजनेमधून या महिला त्यांचा भविष्यात आर्थिकदृष्ट्या अधिक आत्मनिर्भर होऊ शकतील. या योजनेचे नाव आहे, राष्ट्रीय पेन्शन योजना.! म्हणजेच 'एनपीएस'("NPS") योजना..!
मोदी सरकारने घरातील गृहिणींसाठी अलीकडेच ही खास योजना सुरु केली आहे. ही एका प्रकारे गुंतवणूक योजनाच आहे. मात्र, त्याद्वारे आयुष्याच्या वाढलेल्या वयात तुमच्या पत्नीच्या नावे पेन्शन मिळू शकते. तुमच्या पत्नीचे भविष्य सुरक्षित होऊ शकते..
१) गुंतवणूक कशी कराल?
राष्ट्रीय पेन्शन योजनेत( 'एनपीएस' (NPS)) दर महिन्याला किंवा वर्षाला पैसे जमा करता येतात. या योजनेत पत्नीच्या नावाने खाते सुरु करावे लागते व दरमहा त्यात एक हजार रुपयांचीही गुंतवणूक तुम्ही करु शकता.या योजनेमध्ये खाते 60 व्या वर्षी मॅच्युअर होते. मात्र, तुम्ही पत्नीच्या 65 व्या वर्षांपर्यंतही हे खाते चालू ठेवू शकता.
२)त्यामध्ये दोन प्रकारची खाती -
‘एनपीएस’(NPS) योजनेमध्ये 'टीयर -1' आणि 'टीयर-2' अशी दोन प्रकारची खाती आहेत. त्यात ‘टीयर-1’मधील खात्यात पैसे गुंतवल्यास मुदत होई पर्यंत काढता येत नाहीत. मुदत संपल्यानंतरच ते पैसे काढता येतात.'टीयर-2' चे खाते सुरु करण्यासाठी 'टीयर -1'मध्ये खाते असायला लागते. त्यामधे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पैसे जमा करु शकता व रक्कम काढू शकता.
३)कोण किती गुंतवणूक करू शकतो?
'एनपीएस' योजनेमध्ये 18 ते 65 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय व्यक्ती खाते सुरु करू शकतो. एका व्यक्तीला फक्त एकच खाते चालू करता येते. त्यामध्ये संयुक्त खाते असू शकत नाही.योजनेमधील गुंतवणुकीवर किती टक्के परतावा मिळेल, हे अनीच्चित आहे. आतापर्यंत मिळालेला परतावा पाहिल्यास, गुंतवणुकदारांना जवळपास 10 ते 11 टक्के परतावा मिळू शकेल.
४)किती पेन्शन मिळेल?
जर तुमच्या पत्नीचे वय 30 वर्षे असेल. तर तिच्या 'एनपीएस' खात्यात दरमहा 5000 रुपये जमा केले नि त्यावर वार्षिक 10 टक्के परतावा मिळाल्यास पत्नीच्या 60 व्या वर्षी खात्यात 1.12 कोटी रुपये जमा असतील. त्यातील जवळपास 45 लाख रुपये तुमच्या पत्नीला मिळतील. व शिवाय दर महिन्याला 45 हजार रुपयांच्या आसपास हि पेन्शन मिळेल. या योजनेची ही पेन्शन त्यांना आजीवन मिळणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा