मुलगी 18 वर्षाची झाली लगेच मिळतील 65 लाख रुपये,सुकन्या समृद्धी योजना(Sukanya Samruddhi Yojana)..

पंतप्रधान मोदी सरकारने अलिकडे खुप वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. त्याचा सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. मुलींच्या चांगले भवितव्यासाठी मोदी सरकारने अशीच एक योजना आणली होती. तिचे नाव आहे 'सुकन्या समृद्धी योजना'.


आपल्या मुलीने शिक्षण घ्यावे, हे शिक्षण घेताना तिला कोणत्याही आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ नाही आली पाहिजे, त्यामुळे मोदी सरकारने काही दिवसापूर्वी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' (Beti Bachao, Beti Padhao Yojana) ही योजना (Scheme) आणली होती.


'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेअंतर्गत मोदी सरकारने 'सुकन्या समृद्धी योजना' (Sukanya Samruddhi Yojana) ही योजना सुरू केली होती. मुलीने चांगले शिक्षण घेवून स्वताच्या पायावर उभे राहावे असे याचा मागचे कारण होते. या योजनेअंतर्गत मुलीच्या चांगले भविष्य घडावे यासाठी पैशांची गुंतवणूक करता येते.

योजनेमध्ये सहभाग कसा घ्यायचा..? 

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दररोज 416 रुपयांची बचत केल्याने जेव्हा मुलगी 18 वर्षांची होईल तेव्हा तब्बल 65 लाख रुपये मिळू शकतील. मात्र, हे खातं मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत सुरु ठेवता येते. प्रत्येक कुटुंबातील 2 मुलींसाठी ह्या योजनेचा लाभ घेता येतो.

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्यायचा आसेल तर सगळ्यात आगोदर पोस्ट ऑफिस (Indian Post Office) किंवा कोणत्याही बँकेच्या अधिकृत शाखेत मुलीच्या नावाने खातं खोलावे लागेल. मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलगी 10 वर्षांची होण्याचा आत तुम्ही हे खाते उघडू शकता.


9 वर्षानंतर दुप्पट पैसे !

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 250 रुपये भरुनही मुलीच्या नावाने अकाऊंट खोलता येते. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर 9 वर्षे 4 महिन्या नंतर या खात्यातील पैसै दुप्पट होतात. या योजनेमध्ये तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये खात्यामध्ये जमा करु शकता. आणि या योजनेमध्ये दर वर्षाला 7.6 टक्के इतके व्याज दर मिळतो.

मुलगी जेव्हा 21 वर्षांची होते तेव्हा ती स्वत:ही या खात्यातून आपले स्वतःचे पैसे काढू शकते. त्याकारणामुळे मुलीच्या भविष्याच्या दृष्टीने पाहिल्यास ही अत्यंत उत्तम योजना ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने