लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विद्यार्थी अर्थसहाय्य योजना | विद्यार्थी अर्थसहाय्य योजना | Anna Bhau Sathe Student Yojana

Anna Bhau Sathe Student Yojana लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना ही दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आलेली आहे. अण्णाभाऊ साठे योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आपण ह्या लेखामध्ये पाहणार आहोत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विद्यार्थि अर्थसहाय्य योजना उद्दिष्टे

आर्थिक स्वरूपाने दुर्बल घटकातील गुणवत्तावान गरजू विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालये व विद्यापीठ विभागामध्ये अव्यवसायिक यामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी "लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना" हि योजना सुरू केलेली आहे. योजनेमध्ये अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 20 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 10 विद्यार्थ्यास गुणानुक्रमे रू. 3000/- आर्थिक साहाय्य रक्कम देण्यात येणार आहे.

योजनेचे नियम व अटी

  • विद्यार्थी हा भारतीय नागरिक असावा.
  • महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील अव्यवसायिक पदवीसाठी शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त २० विद्यार्थि व अव्यवसायिक पदव्युत्तरसाठी जास्तीत जास्त १० विद्यार्थी ह्या योजनेसाठी पात्र असतील.
  • पात्र असलेल्या विद्यार्थ्याला पदवी व पदव्युत्तर अभ्यास करण्यासाठी ३००० रुपये आर्थिक मदत दिली जाईल.
  • विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० रुपये पेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थ्याने मागील परीक्षेत कमीत कमी ६५ टक्के गुण मिळवलेले असावेत.
  • विद्यार्थ्याची महाविद्यालयात किमान ७५ टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राचार्यांनी दाखला द्यावा लागेल. 
  • विद्यार्थी या योजनेचा लाभार्थी असताना त्याला कोणतीही पगारी नोकरी करता येणार नाही. 
  • विद्यार्थ्याचे बँकमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
  • जर विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभार्थी असेल तर ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. मागिल वर्षीचे मार्कशिट
  2. बँक पासबुक
  3. फोटो
  4. सही
  5. उत्पन्न दाखला


लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा | How to apply Anna Bhau Sathe Student Yojana

  1. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या ब्राउजर मध्ये https://bcud.unipune.ac.in/Scholorships/Applicant/Login.aspx हे संकेतस्थळ उघडा.
  2. त्यानंतर तेथे Username आणि Password टाकून Login करा.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विद्यार्थी अर्थसहाय्य योजना | विद्यार्थी अर्थसहाय्य योजना | Anna Bhau Sathe Student Yojana
  3. त्यानंतर Apply For Scholarship वर क्लिक करा.
  4. पुढे Enter Your Eligibility Number मध्ये Eligibility Number टाकून search करा.
  5. त्यानंतर पुढील स्क्रीनमध्ये संपूर्ण माहिती भरा.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विद्यार्थी अर्थसहाय्य योजना | विद्यार्थी अर्थसहाय्य योजना | Anna Bhau Sathe Student Yojana
  6. संपूर्ण माहिती भरून झाल्यावर Submit बटन वर क्लिक करून सबमिट करा.
  7. त्यानंतर Your Applied Scholarships Details वर क्लिक करुन तुमचे ॲप्लिकेशन View करून पहा.
  8. त्यानंतर Print बटन वर क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करा.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने