भारतामध्ये 26 जानेवारी (26 January) दिवस हा भारतीय प्रजासत्ताक दिवस ( Republic Day of India) म्हणून पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar) यांनी भारताचे संविधान लिहिले आणि संविधान समितीने ते संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आणले गेले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोर येथील रावी नदीच्या तीरावर तिरंगा फडकावून संपूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वज फडकावून त्याला वंदना केली जाते. सर्व भारतीय राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रध्वजचा आदर व्यक्त करतात. 26 जानेवारी दिवस आपल्या देशातील सुवर्ण ( Goldan Day ) दिन म्हणून ओळखला जातो. 26 जानेवारी दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झालेली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे आयोजित केले जाते.
आपण प्रजासत्ताक दिवस का साजरा करतो ( Why we Celebrate Republic Day in Marathi ) -
आपला भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 सालि ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आजाद झाला. त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन ( Independence day ) म्हणून साजरा केला जातो. परंतु 1930 साली 26 जानेवारीला लाहोर येथे काँग्रेसचे पार्टी चे अधिवेशन झाले, त्यामधे अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. त्या अधिवेशनामध्ये तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. या दिवसाची आठवण रहावी म्हणून या दिवशी राज्यघटना अंमलात आणण्याचे निर्णय घेण्यात आला. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम 2 वर्षे 11 महिने व 18 दिवस सुरू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा संपूर्ण मसुदा तयार केला. आणि हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी सादर करण्यात आले. देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी 26 जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्याने सुरू झाले. भारत 26 जानेवारी या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रजासत्ताक दिन चा इतिहास ( History of Republic Day in Marathi ) -
भारत देशाला ब्रिटीश राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य भेटले. या स्वातंत्र्यमागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसेचा मार्ग याचा मोठा वाटा आहे. त्याकाळी स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती ही स्थापना करण्यात आली. या नेमलेल्या मसुदा समितीने संविधानाचा मसुदा तयार केला व तो 4 नोव्हेंबर 1947 रोजी सभेपुढे सादर केला. सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा केलेला प्रस्ताव 166 दिवसांसाठी खुला करण्यात आला आणि 2 वर्ष 11 महिने व 18 दिवसाच्या कालखंडानंतर समितीने तो मसुदा अंतिम केला. खुप विचार विमर्श आणि त्यामधे तरतूद केल्यानंतर समितीच्या 38 सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती त्यामधे हिंदी आणि इंग्रजी ह्या 24 जानेवारी 1950 मध्ये स्वाक्षरांकित केल्या. त्यानंतर दोन दिवसानी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या लागू करण्याच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जावू लागला.
प्रजासत्ताक दिना निमित्त भाषण ( Republic Day Speech and Essey in Marathi) -
शुभसकाळ माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वागोदर मी तुम्हाला माझ्यावतीने प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. आपल्या सर्व भारतवासियांसाठी आज एक महत्त्वाचा दिवस आहे. जेव्हा काही सहकारी भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले मूलभूत अधिकार गमावण्याच्या भीतीबद्दल बोलतात तेव्हा हा दिवस अधिक महत्त्वाचा आहे असे समजते. लहानपणापासून आपण प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करत असतो पण या दिवसाचे खरे महत्त्व आपण मोठे झाल्यावर समजते.
गणतंत्र दिवस ( Republic Day) दरवर्षी 26 जानेवारीला साजरा केला जातो. 1950 मध्ये या दिवशी आपल्या भारताची राज्यघटना लागू झाली. त्यामधे आपल्या संविधानाने आपल्याला विविध प्रकारचे अधिकार आणि जबाबदाऱ्याही दिल्या आहेत. भारत देश हा एक लोकशाही देश आहे आणि आपण त्यात राहतो आणि येथील सर्व मूलभूत अधिकारांचा उपभोग घेतो. समाजामध्ये, आपली जात, धर्म किंवा इतर अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला वेगळे करतात परंतु शेवटी आपण सर्व भारतीय आहोत. भारत देश ही एक भूमी आहे जी 'विविधतेतील एकता' चे चांगले उदाहरण आहे. आपल्या देशाचे सौंदर्य हेच आहे की आपल्या सर्वांची भाषा वेग वेगळी आहे आणि आपल्यात संघर्ष आणि मतभेद देखील आहेत पण आपल्या राष्ट्रीय सणांवर आपण सर्व एकसंघ शक्ती म्हणून उभे राहतो.
लहानपणापासून 26 जानेवारी हा दिवस आपल्या सर्वांसाठी अविस्मरणीय आहे. आपल्यापैकी बरेच जण हा दिवस सण समजतात आणि शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रमांमध्ये सहभागी होऊन साजरा करतात. आपण सर्वचजण प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी उत्साही असतो. ती लष्करी परेड विजय चौकापासून सुरू होते आणि राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर जाऊन थांबते. सैन्य परेडमध्ये दाखवली जाणारी शस्त्रे आणि उपकरणे आपल्या सैन्यदलाची ताकद दर्शवतात.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सशस्त्र दलांना आणि नागरिकांनाही शौर्य पुरस्कार आणि पदके दिली जातात. शौर्य पुरस्कारांचे मुख्य आकर्षण म्हणजे ज्यांनी इतर लोकांचे प्राण वाचविले इतर लोकांना मदत केली असे शौर्य दाखविल्याबद्दल पंतप्रधान व मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कृत केले जाते. परेडच्या परिसरातून जेव्हा शस्त्रास्त्र दलाचे हेलिकॉप्टर वरती उडत जातात आणि सर्व नागरिकांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करतात तेव्हा सर्वांनाच खुप आनंद होतो. शेवटी राष्ट्रगीत होते आणि कार्यक्रमाची सांगता होते. तुम्ही कुठे जरी असाल किंवा वैयक्तिकरित्या परेड पाहत असाल तरीही तुम्ही राष्ट्रगीताला आदर देण्यासाठी उठता. आपली जात, पंथ, धर्म, राज्य, भाषा आणि रंग याना एकीकडे ठेवून विचार करायला लावणारा हा दिवस आणि आपल्या सर्वाना आपल्या देशावर प्रेम करण्याची समान भावना दाखवतो.
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामध्ये काय फरक आहे ( Difference between Independence Day and Republic Day ) -
प्रत्येक भारतवासियांसाठी दोन सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे 26 जानेवारीला साजरा होणारा प्रजासत्ताक दिन आणी 15 ऑगस्ट रोजी साजरा होणारा स्वातंत्र्यदिन. या दोन्ही दिवसांमधील फरक म्हणजे 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य साली भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दीन म्हणून ओळखला जातो. 26 जानेवारी 1950 ला देशाची घटना शेवटी स्वीकारली गेली आणि राष्ट्र प्रजासत्ताक म्हणून घोषित केले गेले म्हणून 26 जानेवारी प्रजासत्ताक दीन म्हणून साजरा करतात.
भारताच्या स्वातंत्र्य घोषणेवर 1947 रोजी स्वाक्षरी करण्यात आली त्यामुळे तो भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून ओळखला गेला आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा मसुदा बनवण्यात आला आणि 26 जानेवारी 1950 रोजी तो अंमलात आणल्या गेला, त्यामुळे प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.
टिप्पणी पोस्ट करा