Omicron हा कोरोना व्हायरस चा नवीन प्रकार आहे.जेव्हा Omicron बद्दल समजले आहे तेव्हा पासून संपूर्ण जगात चिंताजनक स्थिती आहे.जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) हा वेरियंट चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे. अनेक देशांनी प्रवास बंद केला आहे.
ओमिक्रॉनचा शोध हा दक्षिण आफ्रिका मध्ये लागला आहे. दक्षिण आफ्रिका येथील अँजेलिक कोएत्झी या डॉक्टर नी त्याचा शोध लावला आहे.त्यांनी आसे सांगितले की आतापर्यंत ज्या व्यक्तींना ओमिक्रोन चा संसर्ग झाला आहे तो सोम्य प्रकारात झाला आहे.तो तीव्र होण्या आगोदर त्याचावर संशोधन केले पाहिजे.आतापर्यंत ओमिक्रॉनची लागण झालेले बहुतेक रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. ओमिक्रॉनची काही लक्षणे आहेत जी पूर्णपणे वेगळी आहेत. संसर्ग झालेल्यांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणे सौम्य आहेत. तर काही रुग्ण रुग्णालयात दाखल न होताच बरे झाले आहेत.
ज्या व्यक्तींना ओमिक्रॉनची लागण झाली आहे त्या व्यक्तींना अत्यंत थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे आणि कोरडा खोकला येणे असे लक्षणे दिसतात.ताप पण येतो.ओमिक्रॉनचे सारे लक्षणे डेल्टा पेक्षा वेगळे आहेत.
टिप्पणी पोस्ट करा